नागा साधूच्या रूपात सैफ

'लाल कप्तान'ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटात सैफचा वेगळा लुक पहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यानुसार या चित्रपटात सैफचं आजवर कधीही न पाहिलेलं रूप पहायला मिळणार आहे.

SHARE

२०१३ नंतर एका मागोमाग एक फ्लॅाप चित्रपट देणारा सैफ अली खान सध्या एका हिटच्या शोधात आहे. या शोधात त्यानं आपला अवतारच बदलून टाकला आहे. 'लाल कप्तान' या आगामी चित्रपटात नागा साधूच्या रूपातील सैफ पहायला मिळणार आहे.


६ सप्टेंबरला प्रदर्शित 

सैफ अली खान प्रमाणंच निर्माता-दिग्दर्शक आनंद एल. रायही एका हिट फिल्मच्या शोधात आहेत. शाहरुख खानसोबतच्या 'झीरो'नं शीर्षकाप्रमाणंच त्यांच्या हाती झीरो दिल्यानंतर सैफसोबतच्या 'लाल कप्तान' या चित्रपटाकडून राय यांना खूप अपेक्षा आहेत. राय यांनी इरॅास इंटरनॅशनलच्या साथीनं 'लाल कप्तान'ची निर्मिती केली आहे. 'लाल कप्तान'मधील सैफचा लुक रिव्हील करताना या चित्रपटाची रिलीज डेटही घोषित करण्यात आली आहे. ६ सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


अॅक्शन ड्रामा

नवदीप सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'लाल कप्तान' हा चित्रपट म्हणजे एक अॅक्शन ड्रामा आहे. या चित्रपटाचं कथानक ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. 'लाल कप्तान'ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटात सैफचा वेगळा लुक पहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यानुसार या चित्रपटात सैफचं आजवर कधीही न पाहिलेलं रूप पहायला मिळणार आहे. या चित्रपटात सैफनं एका नागा साधूची भूमिका साकारली आहे, जो सूड आणि विश्वासघातावर आधारित असलेल्या यात्रेवर निघाला आहे.


डझनभर चित्रपट फ्लाॅप

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित झाल्यानं नागा साधूच्या गेटअपमधील सैफ पहाण्यासाठी त्याच्या चाहत्यांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. राय यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाच्या कथानकावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हा एक असा चित्रपट आहे, जो निश्चितपणं स्वत:ची एक वेगळी शैली सादर करणारा ठरेल असंही राय यांचं म्हणणं आहे. राय यांचं म्हणणं काहीही असो, पण एका हिट चित्रपटाची सैफची तहान हा चित्रपट भागवतो का ते महत्त्वाचं आहे. २०१३ मध्ये सैफचा 'रेस २' सुपरहिट झाला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेले सैफचे डझनभर चित्रपट बॅाक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत.हेही वाचा-

ऐश्वर्याचा ट्वीटरवर शेअर केलेला फोटो विवेक ओबेरॉयला भोवला

भारतीय नौदलावर आधारित 'नेव्ही डे'
संबंधित विषय
ताज्या बातम्या