Advertisement

सलमानला मुलं हवीत, पण मुलांची आई नको?

वाचून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. सलमान खानला मुलं हवी आहेत, पण त्यांची आई नको, असं म्हणत बॅलिवुडमधील मोस्ट बॅचलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमाननं आपल्या लग्नाच्या प्रश्नाला जणू पूर्णविराम दिला आहे.

सलमानला मुलं हवीत, पण मुलांची आई नको?
SHARES

वाचून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. सलमान खानला मुलं हवी आहेत, पण त्यांची आई नको, असं म्हणत बॅलिवुडमधील मोस्ट बॅचलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमाननं आपल्या लग्नाच्या प्रश्नाला जणू पूर्णविराम दिला आहे.


लग्नाशिवाय पिता 

बऱ्याच अभिनेत्रींसोबत अफेयर केल्यानंतर सलमान लग्न कधी करणार? हा प्रश्न मागील बऱ्याच वर्षांपासून त्याच्या चाहत्यांसोबतच सर्वांना सतावत आहे. या प्रश्नाचं सलमाननं ‘नाही’ असं अप्रत्यक्षरीत्या उत्तर दिलं आहे. ५३ वर्षे वय असणाऱ्या सलमाननं प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याचा उलगडा केला आहे. सलमानला लहान मुलं खूप आवडतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळंच ‘सलमान लग्नाशिवाय पिता बनणार’ अशा आशयाच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. आता त्यामागील कारणही समोर आलं आहे.


आई मात्र नको

एका मुलाखतीदरम्यान सलमाननं हे मान्यही केलं आहे. तो म्हणाला की, मला मुलं हवीत, पण त्यांची आई मात्र नको. लग्नाबाबत विचारताच सलमाननं आपलं नेहमीचं ठरलेलं उत्तर दिलं. तो म्हणाला की, सध्या तरी विचार नाही. सलमानला मुलांची आई नको, पण मुलं मात्र हवीत. त्यामुळं तो शाहरुख खान, करण जोहर यांच्या पावलावर पाऊल टाकत सरोगसीद्वारे मुलांना जन्म देतो की, आणखी कोणता पर्याय निवडतो ते पाहायचं आहे.


भारतवर लक्ष

सलमाननं सध्या आपलं संपूर्ण लक्ष ‘भारत’ या आगामी चित्रपटावर केंद्रित केलं आहे. ईदच्या मुहूर्तावर ५ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून सलमानसोबतच सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. ‘अन ओडे टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटात सलमानचे वेगवेगळे लुक्स पहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक अली अब्बास झफर यांच्या या चित्रपटात सलमानसोबत पुन्हा एकदा कतरीना कैफ दिसणार आहे.



हेही वाचा -

'स्माईल प्लीज'नं केली आदितीची इच्छापूर्ती

दोन वेंगसरकर एकत्र!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा