Advertisement

'किक' मारण्यापूर्वी सलमान म्हणणार 'इंशाअल्लाह'

भारत' नंतर सलमान 'दबंग ३'म ध्ये पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या रूपात भेटणार आहे. 'भारत'मध्ये त्याच्यासोबत कतरीना कैफ आहे, तर 'दबंग ३'मध्ये सोनाक्षी सिन्हा. त्यानंतर तो संजय लीला भन्साळींच्या 'इंशाअल्लाह'साठी वेळ देणार असल्याचं समजतं.

'किक' मारण्यापूर्वी सलमान म्हणणार 'इंशाअल्लाह'
SHARES

सलमान खाननं सध्या आपलं लक्ष 'भारत' चित्रपटावर केंद्रित केलं असलं तरी त्याच्या आगामी चित्रपटांचीही खूप चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान 'किक २'पूर्वी 'इंशाअल्लाह'च्या शूटला प्रारंभ करणार आहे.


'किक २'ही करणार 

आज केवळ सलमानच्या चाहत्यांनाच नव्हे, तर बॅालिवुडलाही 'भारत'चे वेध लागले आहेत. ईद जवळ येत असल्यानं 'भारत'साठी प्रेक्षकांना आता फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. सलमानला मात्र 'भारत'चं जराही टेंशन नाही. 'दबंग ३'सोबतच इतरही चित्रपटांसाठी दिलेल्या तारखा पाळत सलमान 'भारत'चं जोरदार प्रमोशनही करत आहे. अशातच सलमानच्या आगामी दोन महत्त्वपूर्ण चित्रपटांबाबतची माहिती समोर आली आहे. 'किक'च्या यशानंतर सलमान 'किक २'ही करणार असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करण्यात येणार होतं, पण आता त्यापूर्वी सलमान 'इंशाअल्लाह' या चित्रपटाचं शूट सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


पुन्हा चुलबुल पांडे

'भारत' नंतर सलमान 'दबंग ३'म ध्ये पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या रूपात भेटणार आहे. 'भारत'मध्ये त्याच्यासोबत कतरीना कैफ आहे, तर 'दबंग ३'मध्ये सोनाक्षी सिन्हा. त्यानंतर तो संजय लीला भन्साळींच्या 'इंशाअल्लाह'साठी वेळ देणार असल्याचं समजतं. या चित्रपटात सलमानच्या जोडीला आलिया भट्ट आहे. याच दरम्यान तो साजीद नाडीयादवालांच्या 'किक २'चंही चित्रीकरण करणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुढल्या वर्षी ईदला सलमानचा 'इंशाअल्लाह' आणि अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आमनेसामने उभे ठाकणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती, पण आता गणितं काहीशी बदलली आहेत. त्यामुळं चित्रीकरणाच्या शेड्युलमध्येही थोडाफार फरक होणार आहे.


नवोदित अभिनेत्रीच्या शोधात

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार सलमाननं स्वत: अक्षयशी संपर्क साधून दोन चित्रपटांमध्ये क्लॅश होणार नसल्याची खात्री दिल्याचं सूत्रांकडून समजतं. खरं तर पूर्वी केलेल्या प्लॅनिंगनुसार सलमानचा 'किक २' भन्साळींच्या 'इंशाअल्लाह' च्या अगोदर प्रदर्शित होणार होता. पण नाडीयादवालांच्या 'किक २'ची फायनल स्क्रीप्ट रेडी न झाल्यानं त्यांनी अद्याप शूटिंगचं शेड्युल तयार केलेलं नाही. याखेरीज ते या चित्रपटासाठी एका नवोदित अभिनेत्रीच्या शोधात आहेत. यासाठी त्यांना आणखी वेळ लागणार असल्याचं समजतं. त्यामुळं सलमान 'किक २' पूर्वी 'इंशाअल्लाह'साठी वेळ देणार आहे.



हेही वाचा -

दादरमधील प्रसिद्ध चित्रा चित्रपटगृह आजपासून होणार बंद

प्रथमेश-मिलिंदचं ‘टकाटक’ पोस्टर पाहिलं का?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा