दादरमधील प्रसिद्ध चित्रा चित्रपटगृह आजपासून होणार बंद

एकेकाळी मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळालेला ५५० आसनी चित्रा चित्रपटगृह गुरूवारपासून बंद होणार आहे.

SHARE

दादर पूर्व येथील प्रसिद्ध चित्रा चित्रपटगृह मागील अनेक वर्ष वेगवेगळे चित्रपट पडद्यावर दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. एकेकाळी मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळालेलं ५५० आसनी चित्रा चित्रपटगृह गुरूवारपासून बंद होणार आहे. जॅकी श्रॉफचा यांचा मुलगा आणि अभिनेता टायगर श्रॉफ याचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटाचा शेवटचा शो या सिनेमागृहात दाखवण्यात येणार आहे.


प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद

गुरूवारी रात्री ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटाचा शेवटचा शो या सिनेमागृहात दाखवण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या चित्रपटगृहाची धुरा पीडी मेहता यांचा मुलगा दारा मेहता यांनी सांभाळली होती. मात्र, या चित्रपटगृहाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसून आर्थिक चणचण जाणवत असल्यानं हे चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


चित्रपटगृहाला पसंती

चित्रा चित्रपटगृहात १९६१ साली प्रदर्शित झालेला शम्मी कपूर यांचा 'जंगली' हा चित्रपट जबरदस्त गाजला होता. हा सिनेमा या चित्रपटगृहात तब्बल २५ आठवडे चालला होता. त्यावेळी या चित्रपटगृहाला मराठी प्रेक्षकांची पसंती मिळत होती. परंतु, कालांतरानं या चित्रपटगृहाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळू लागला आणि आर्थिक चणचणही जाणवू लागली. त्यामुळंच हे चित्रपटगृह बंद करण्यात येणार असल्याची माहिती दारा मेहता यांनी एका वृत्तपत्राला दिली.


टायगरच्या सिनेमानं शेवट

या चित्रपटगृहात १९८३ साली प्रदर्शित झालेला अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा ‘हिरो’ हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यावेळी या चित्रपटाचे हाऊसफुल शो सुरु होते. एकेकाळी जॅकी श्रॉफ यांचा चित्रपट या चित्रपटगृहात सुपरहीट झाला होता. त्याच चित्रपटगृहाचा शेवट त्यांचा मुलगा म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफच्या सिनेमानं होणार आहे.हेही वाचा -

महाराष्ट्रातील २८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

वडाळा पोलिसांची मृत्यूच्या छायेतील दहा वर्ष संपलीसंबंधित विषय
ताज्या बातम्या