Advertisement

राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचा आरोप

MeToo मोहिमेअंतर्गत आणखी एका मोठ्या दिग्दर्शकाचं नाव समोर आलं आहे. संजू चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर एका महिलेनं लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचा आरोप
SHARES

'पीके', 'संजू', 'थ्री इडियट्स' यांसारख्या चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. हिरानी यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेनं हे आरोप केले आहेत. मात्र, राजकुमार हिरानी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत

अनेकदा लैंगिक शोषण केल्याचा आरोप

हफ्फ पोस्टला दिलेल्या मुलाखतीत या महिलेनं म्हटलं की, "मार्च ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत हिरानी यांनी माझ्याशी गैरवर्तवणूक केली. सुरुवातीला हिरानी माझ्यावर अश्लिल शेरेबाजी करायचे. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांनी माझे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. शोषणाचा विरोध केला असता माझ्याकडून चित्रपट काढून घेतले जातील अशी धमकी दिली. माझ्याकडे असलेले काम घालवायचे नव्हते त्यामुळे मी आवाज उठवला नाही. सहा महिने माझ्यावर लैंगिक अत्याचार सुरू होते." 

चौकशी समितीची स्थापना 

संबंधित महिलेनं सर्व प्रकार मेलद्वारे दिग्दर्शक निर्माता विधू विनोद चोप्रा, समीक्षिका अनुपमा चोप्रा, पटकथा लेखक अभिजित जोशी आणि विधू विनोद यांची बहिण शेली चोप्रा यांना पाठवला होता. याचा अधिक तपास करण्यासाठी विदू विनोद चोप्रा यांनी एक समिती स्थापन केली होती. या समितीकडून अजून कुठलाही अहवाल समोर आला नाही.     

हिरानी यांनी आरोप फेटाळले

दुसरीकडे हिरानी यांनी आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. "दोन महिन्यापूर्वीचं हे प्रकरण आहे. हे प्रकरण माझ्यासमोर आलं तेव्हा मला धक्का बसला. माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. माझी बदनामी करण्याचा हा कट आहे," असं स्पष्टीकरण हिरानी यांनी दिलं.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा