Advertisement

आईच्या मृतदेहाजवळ खेळणारा 'तो' चिमुकला, आता जबाबदारी उचलणार मीर फाऊंडेशन

शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशननं त्या मुलाची जबाबदारी उचलली आहे.

आईच्या मृतदेहाजवळ खेळणारा 'तो' चिमुकला, आता जबाबदारी उचलणार मीर फाऊंडेशन
SHARES
Advertisement

नुकताच मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका प्रवासी महिलेचा भूकेमुळे मत्यू झाला. त्यानंतर जे चित्र होतं ते पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारं होतं. या महिलेचा निरागस मुलगा आईच्या मृतदेहावर घातलेल्या चादरीशी खेळत होता. हे दृश्य पाहून देश हादरला. आता या मुलाचं पुढे काय? त्याला कोण बघणार? असे बरेच प्रश्न अनेकांच्या मनात आली. पण आता या मुलाच्या भविष्याची जबाबदारी बॉलिवूड किंग शाहरुख खाननं घेतली आहे.

शाहरुख खान आणि त्याच्या मीर फाउंडेशननं मुलाला आर्थिक मदतीची ऑफर दिली आहे. तो आता त्याच्या आजी-आजोबांकडे राहतो. मीर फाउंडेशननं यासंदर्भात ट्विट केलं आहे की, प्रत्येकाच्या हृदयात माणुसकी जागवणाऱ्या या व्हिडिओत तो आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. या मुलापर्यंत पोहचण्यास मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. आता आम्ही त्याला मदत करीत आहोत आणि तो त्याच्या आजोबांच्या देखरेखीखाली आहे.

व्हिडिओमध्ये, एक मुलगा त्याच्या आईच्या मतदेहा जवळ खेळताना दिसला. बिहारच्या मुजफ्फरनगर रेल्वे स्थानकातील घटना आहे. अरविना खातून नावाची एक ३५ वर्षीय महिला रेल्वे स्थानकावर मृत असल्याचं दिसून आलं. ही महिला आणि तिची दोन मुलं २५ मे रोजी अहमदाबादहून श्रमीक स्पेशल ट्रेनने घरी जात होते.

शाहरुख खान या कठीण काळात देशातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. अलीकडेच कोलकाताला अम्फान चक्रीवादळाचा परिणाम झाला होता. यावेळी देखील शाहरुख खान आणि त्यांची पत्नी गौरी खान यांच्यासह कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमच्या मदतीनं लोकांच्या मदतीसाठी पुढे आले.हेही वाचा

सोनू सूद गुगल ट्रेंडमध्ये अव्वल

बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानचं निधन

संबंधित विषय
Advertisement