२० वर्षानंतर शाहरुख-संजय लीला भन्साली पुन्हा एकत्र

शाहरुख खान आणि संजय लीला भंसाळी तब्बल वीस वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. दोघांनी वीस वर्षांपूर्वी देवदास चित्रपटासाठी सोबत काम केलं होतं. आता 'इजहार' या चित्रपटात हे दोघं एकत्र काम करणार आहेत.

SHARE

शाहरुख खान आणि संजय लीला भंसाळी तब्बल वीस वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. दोघांनी वीस वर्षांपूर्वी देवदास चित्रपटासाठी सोबत काम केलं होतं. आता 'इजहार' या चित्रपटात हे दोघं एकत्र काम करणार आहेत. दोघांनी नुकतंच या टायटलची नोंदणी केली आहे. पण या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.

संजय भंसाळी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार नसल्याचं समजतंय. शाहरुख आणि भंसाळी दोघेही एकत्रितपणे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. दोघेही लवकरच चर्चा करून चित्रपटाच्या कास्टिंगबाबत निर्णय घेणार असून या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा करू शकतात. पण याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही.
हेही वाचा -

पी. टी. उषाची भूमिका साकारणार कतरिना?

'अंग्रेजी मिडियम'मध्ये इरफानसोबत झळकणार करिनासंबंधित विषय
ताज्या बातम्या