Advertisement

अलविदा शशी कपूर!


अलविदा शशी कपूर!
SHARES

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी तीन राऊंड गन फायरिंग करून त्यांना सलामी दिली. मुंबईतील सांताक्रूज स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर युएसला स्थायिक आहे. मंगळवारी सकाळी तो भारतात आला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांना २०११ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. पद्मविभूषणनं गौरवण्यात आलेल्या व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतातशशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार सांताक्रूझमधील स्मशानभूमीत दाखल झाले होते. अमिताभ बच्चन, अनिल कपूर, संजय दत्त यांसारखे अनेक कलाकार शशी कपूर यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते

'बॉलिवूडचा चॉकलेट हिरो' अशी ओळख असलेले शशी कपूर यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. वयाच्या ७९ व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दीर्घ काळापासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते. आजारपणामुळे शशी कपूर यांची तब्येत खालावली होती. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.१९६१ साली आलेल्या 'धर्मपुत्र' या चित्रपटात शशी कपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. जब जब फुल खिले, शर्मिली, कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा चित्रपटांमधल्या त्यांच्या एकाहून एक भूमिका चांगल्याच गाजल्या. दीवार हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरला. शशी कपूर यांनी ११६ चित्रपटांमध्ये काम केलं. त्यापैकी ६१ चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.हेही वाचा

शशी कपूर, 'ती' आणि बरंच काही!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा