'निकम्मा'साठी शिल्पाचं कमबॅक

मागील काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर गेलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीची पावलं पुन्हा रुपेरी पडद्याकडं वळली आहेत. 'निकम्मा' या चित्रपटाद्वारे शिल्पा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.

SHARE

मागील काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर गेलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीची पावलं पुन्हा रुपेरी पडद्याकडं वळली आहेत. 'निकम्मा' या चित्रपटाद्वारे शिल्पा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.


महत्त्वपूर्ण भूमिकेत

लाखों दिलों की 'धडकन' असं जिचं वर्णन केलं जातं ती शिल्पा शेट्टी मागील जवळजवळ १२ वर्षांपासून फुल फ्लेज भूमिकेत चित्रपटांमध्ये दिसलेली नाही. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अपने' या चित्रपटात ती सनी देओलसोबत दिसली होती. त्यानंतर आलेल्या 'ओम शांती ओम' या सुपरहिट चित्रपटात तिचा स्पेशल अपिरीयन्स पहायला मिळाला. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दोस्ताना'मध्येही तिनं दर्शन दिलं, पण केवळ एका गाण्यात... अलीकडच्या काळात २०१४ मध्ये 'ढिशक्यांव'मध्ये पुन्हा तिनं गाण्यातच आपली झलक दाखवली, पण आता ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं समजतं.


एक नवं रूप

'निकम्मा' या आगामी हिंदी चित्रपटात शिल्पाचं एक नवं रूप पहायला मिळणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या वेगात सुरू आहे. या चित्रपटाद्वारे 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी चंदेरी दुनियेत एंट्री करणार आहे. त्याच्या जोडीला शिर्ले सेठीया ही अभिनेत्री दिसणार आहे. या दोन नवोदितांसोबत शिल्पाचा अभिनयही प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे. दिग्दर्शन सब्बीर खान करत असून, सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन आणि सब्बीर खान फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. पुढल्या वर्षी उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.हेही वाचा  -

क्रिकेट देवतेच्या रूपात सोनम कपूर

'उधाण वारा' घेऊन मराठीकडे वळले सतीश कौशिक
संबंधित विषय
ताज्या बातम्या