Advertisement

सिंगर अनूप जलोटा आयसोलेशनमध्ये, अभिनेत्री रश्मी देसाईची तपासणी

अनूप जलोटा लंडनहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे चार वाजता पोहोचले. त्यानंतर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं.

सिंगर अनूप जलोटा आयसोलेशनमध्ये, अभिनेत्री रश्मी देसाईची तपासणी
SHARES

भजन गायक अनूप जलोटा यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. अनूप जलोटा नुकतेच युरोपमधून परतले होते. हॉलंड, जर्मनी, लेस्टर आणि लंडन अशा शहरांमध्ये त्यांचे कार्यक्रम घेतल्यानंतर अनूप जलोटा लंडनहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे चार वाजता पोहोचले. तिथून त्यांना थेट मिरज हॉटेलमध्ये नेण्यात आलं. कोरोना व्हायरसच्या जोखमीमुळे त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.


अनूप जलोटांचा फोटो व्हायरल

अनूप जलोटा यांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी आपला फोटो शेअर केला आणि लिहिलं की, 'पालिकेनं दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला विमानतळावरून थेट मिरज हॉटेलमध्ये नेण्यात आलं. माझ्याकडे डॉक्टरांची एक टीम पाठवली आहे. मी विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवाहन करतो की, त्यांनी विमानतळावर येताच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करून घ्यावी.दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना देखील आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सायरा बानो यांनी ही खबरदारी घेतली आहे. अनेकदा प्रकृती बिघडल्यानं दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सायरा बानो यांना कुठलीच जोखीम घ्यायची नाही. म्हणून दिलीप कुमार यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.  


रश्मी देसाईची तपासणी

कोरोना व्हायरसमुळे मनोरंजन क्षेत्रातही भितीचं वातावरण आहे. बर्‍याच चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांचं शूटिंग थांबलं आहे. जिथे अद्याप शूटिंग चालू आहे तिथं बरीच काळजी घेतली जात आहे.


दरम्यान, आता रश्मी देसाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मी तिच्या नागीन शोच्या सेटवर तिची चाचणी घेत आहे. एक व्यक्ती रश्मीचं तापमान तपासत आहे.हेही वाचा

Coronavirus : दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये

Coronavirus Updates: करोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद

संबंधित विषय
Advertisement