Advertisement

गायक लकी अलीला कर्करोग?


गायक लकी अलीला कर्करोग?
SHARES

'कहो ना प्यार है' सिनेमातून पार्श्वगायनाची सुरुवात करणारे प्रसिद्ध गायक लकी अली यांनी 'डियर किमोथेरपी, यू शूड नॉट बी अॅन ऑप्शन' असं ट्विट करताच त्याचे चाहते गोंधळून गेले आहेत.

अभिनेता इरफान खानला 'न्यूरॉइंडोक्राइन सिंड्रोम' झाल्याचं ऐकून बाॅलिवूडकरांना जबरदस्त धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरत नाहीत तोच अभिनेत्री सोनाली बेंद्रेला 'हाय ग्रेड कॅन्सर'चं निदान झाल्याचं कळताच बाॅलिवूडमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. त्यात पुन्हा लकी अलीचं ट्विट वाचून त्याचे चाहते गोंधळून गेले.



या ट्विटवर खुलासा करताना लकी अलीने सांगितलं की "कर्करोगाच्या उपचारदरम्यान माझ्या मित्राचा मृत्यू झाला. किमोथेरपीच्या विरोध करण्यासाठी मी हे ट्विट केलं."



नक्की कशी असते किमोथेरपी?

एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे कर्करोगतज्ञ डॉ. रमाकांत देशपांडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला किमोथेरपीबद्दल माहिती देताना सांगितलं की, किमोथेरपी ही कर्करोगावरील उपचारपद्धती आहे. किमोथेरपी औषध गोळ्या किंवा आयव्हीच्या माध्यमातून दिली जाते. किमोथेरपीद्वारे कॅन्सच्या पेशी प्रभावी पद्धतीने नष्ट केल्या जातात. आयव्हीच्या माध्यमातून किमोथेरपी करताना औषधांची ६ ते ८ चक्रं द्यावी लागतात. या चक्रांमध्ये ३ आठवड्यांचं अंतर ठेवावं लागतं. अनेकदा काही औषधं आठवड्यांतून एकदाच देण्यात येतात.


किमोथेरपीचे दुष्परिणाम?

किमोथेरपीच्या तीव्रतेमुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. त्यामुळे रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता बळावते. म्हणून किमोथेरपी दरम्यान कॅन्सरच्या रुग्णांना गर्दीत न मिसळणे, तोंडावर मास्क घालणे, पाणी उकळून पिणे, कच्ची फळं न खाणे इ. सल्ले देण्यात येतात. काही रुग्णांना मळमळणे, चक्कर, ताप येणे हे त्रासही जाणवतात. किमोथेरपीतील तीव्र डोसमुळे किडनी, यकृत, आणि बोन मॅरोलादेखील इजा होऊ शकते. कधी कधी किमोथेरपीच्या दाहकतेमुळे हे अवयव निकमीदेखील होऊ शकतात.


नवी उपचारपद्धती

सध्या किमोथेरपीत नवीन उपचारपद्धतीचा समावेश झाला आहे. ग्रोथ फॅक्टरचा वापर करून रुग्णाचे गळालेले केस पुन्हा परत आणले जातात. त्याशिवाय टार्गेटेड थेरपीच्या वापरातून केवळ कॅन्सरच्या पेशींनाच लक्ष्य केलं जातं. ज्यामुळे रुग्णाला इतर दुष्परिणाम होत नाही.

देशाची लोकसंख्या सुमारे १३० कोटी असून दरवर्षी किमान ११ लाख लोकांना कर्करोग होतो आणि येणाऱ्या १५ वर्षांत याचा आकडा वाढू शकतो. सरकारी रुग्णालयात किमोथेरपीचा खर्च कमी असतो, तर खासगी रुग्णालयात किमोथेरपीचा खर्च कमीत कमी १ लाख इतका असतो.



हेही वाचा-

सावधान...देशात वाढत चालला आहे कर्करोग !

आजारानंतरचा इरफानचा पहिला फोटो व्हायरल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा