Advertisement

दबंग सलमान खानचे भाऊ अडचणीत, खार पोलिस ठाण्यात गुन्हा


दबंग सलमान खानचे भाऊ अडचणीत, खार पोलिस ठाण्यात गुन्हा
SHARES

 बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे दोन भाऊ अभिनेता सोहेल खान आणि दिग्दर्शक अरबाज खान यांच्यासह निर्वान खान विरोधात कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेने गुन्हा नोंदवला आहे. परदेशाहून मुंबईत परतलेल्या प्रत्येकाला क्वारंटाइन राहणं बंधनकारक आहे. असं असताना सलमानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि पुतण्या निर्वाण खान यांनी मात्र या नियमांचं उल्लंघन केलं. या प्रकरणी  मुंबई महापालिकेनं खार पोलिस ठाण्यात  सोहेल खान (sohail khan), अरबाज खान (arbaaz khan) आणि निर्वाण खान (nirvaan khan) यांच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. 

हेही वाचाः- चिंतेत वाढ! महाराष्ट्रात नव्या कोरोनाचे ८ रूग्ण आढळले

यूकेत नवा कोरोना आढळल्यानंतर भारतानं कोरोनासंबंधित नियम अधिक सक्त केले आहेत. विमानतळावर सर्वांची तपासणीही केली जाते आहे. परदेशातून आलेल्या प्रत्येकाला क्वारंटाइन होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हाच नियम मुंबई महापालिकेनंही लागू केला आहे. त्यानुसार परदेशाहून मुंबईत परतलेल्या प्रत्येकाला क्वारंटाइन राहणं बंधनकारक आहे. असं असताना सलमानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि पुतण्या निर्वाण खान यांनी मात्र या नियमांचं उल्लंघन केलं. २५ डिसेंबरला तिघंही यूएईहून मुंबईत आले. मुंबई विमानतळावर ते उतरले. त्यांना ७ दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं. तेव्हा त्यांनी आपलं बुकिंग ताज लँड्समध्ये असल्याचं सांगितलं. पण तिघंही परस्पर घरी निघून गेल्याचं उघडकीस आलं. त्यांचा हा बेजबाबदारपणा त्यांना चांगलाच भोवला आहे. त्यांनी क्वारंटाइनचा नियम मोडल्यानं साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत महापालिकेकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खार पोलीस ठाण्यात या एफआयआरची नोंद आहे.

हेही वाचाः- ‘या’ दिवशी होतील दहावी, बारावीच्या परीक्षा, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

यूकेत आढळलेल्या कोरोनाचे रुग्ण भारताही आढळून आले आहेत. हा कोरोना महाराष्ट्रापर्यंतही पोहोचला आहे. राज्यात  8 प्रवाशांमध्ये ही नव्या विषाणूची लक्षणं दिसली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नव्या विषाणूची लक्षणं दिसलेल्या 8 पैकी 5 मुंबईत आहेत, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मध्ये प्रत्येकी एकेक जण आहे. या सर्व रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि आता ते ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा