Advertisement

'८३ साठी ताहिर बनला लिटिल मास्टर

भारतीय क्रिकेट इतिहासातील तो सुवर्णक्षण पडद्यावर आणण्यासाठी दिग्दर्शक कबीर खान आणि त्यांची टिम सज्ज झाली आहे.

'८३ साठी ताहिर बनला लिटिल मास्टर
SHARES

१९८३ मध्ये संपूर्ण विश्वावर अधिराज्य गाजवत वर्ल्ड कप आपल्या नावे करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची पुर्नबांधणी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. भारतीय क्रिकेट इतिहासातील तो सुवर्णक्षण पडद्यावर आणण्यासाठी दिग्दर्शक कबीर खान आणि त्यांची टिम सज्ज झाली आहे. या संघात आता अभिनेता ताहिर राज भसीनचीही वर्णी लागली आहे.


रणवीर सिंग कर्णधार

‘८३ असं शीर्षक असलेल्या या सिनेमात रणवीर सिंग विश्वविजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. जगभरामध्ये लिटिल मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान क्रिकेटर सुनील गावसकर यांनीही या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. आज क्रिकेट समालोचकाच्या भूमिकेत शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या गावसकर यांनी मैदानावर केलेली आतषबाजी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. रुपेरी पडद्यावर त्यांची भूमिका साकारण्यासाठी ताहीर राज भसीनची निवड करण्यात आली आहे.


कबीर यांना विश्वास

गावसकर यांच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड करणं खूप आव्हानात्मक होतं असं दिग्दर्शक कबीर खान यांचं म्हणणं आहे. मुख्य भूमिकेतील कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणवीरची निवड केल्यानंतर गावसकर कोणाला बनवायचं हा यक्ष प्रश्न होता. ताहीरच्या निवडीमुळे तो तिढा सुटला आहे. गावसकर त्या टिमचे सुपरस्टार होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्यास समर्थ असणारा कलाकार कबीर यांना हवा होता. गावसकर यांच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरीलही कामाला ताहीर उचित न्याय देईल, असा कबीर यांना विश्वास वाटतो.


गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव

लिटिल मास्टर यांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्याची संधी मिळणं ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं ताहिरचं म्हणणं आहे. तो म्हणाला की, टेस्ट क्रिकेट विश्वातील सर्वात महान फलंदाज असलेल्या सुनील गावसकर यांची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या मी गावसकरांच्या चेंडू फेकण्याच्या शैलीचा सराव करत आहे. याशिवाय त्यांची फलंदाजी करण्याची शैलीही आत्मसात करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. हा सराव पूर्ण झाल्यावर त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.


पहिल्या विश्वचषकाची यशोगाथा

१९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघानं जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकाची यशोगाथा सांगणारा ‘८३ हा सिनेमा हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही बनणार आहे. एकाच वेळी या तीन भाषांमध्ये बनणारा हा पहिला त्रिभाषी सिनेमा आहे. या सिनेमाचं चित्रीकरण वास्तववादी लोकेशन्सवर करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला चित्रीकरणाला प्रारंभ करून १० एप्रिल २०२० रोजी सिनेमा प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.



हेही वाचा -

जलवा दिव्याच्या सौंदर्याचा!

'कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंची हकालपट्टी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा