जलवा दिव्याच्या सौंदर्याचा!

नुकत्याच पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमारच्या अदांनी उपस्थितांना घायाळ केलं. त्या शोमधील ही दिव्याची झलक…

  • जलवा दिव्याच्या सौंदर्याचा!
  • जलवा दिव्याच्या सौंदर्याचा!
  • जलवा दिव्याच्या सौंदर्याचा!
  • जलवा दिव्याच्या सौंदर्याचा!
SHARE

एखाद्या अभिनेत्रीचं फॅशन शोमध्ये कॅटवाक करत उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकवणं तसं आश्चर्याचं नाही, पण सध्या दिग्दर्शनात रमलेली एखादी दिग्दर्शिका जेव्हा आपल्या सौंदर्याचा जलवा फॅशन शोमध्ये दाखवते, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. नुकत्याच पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमारच्या अदांनी उपस्थितांना घायाळ केलं. त्या शोमधील ही दिव्याची झलक…


अभिनयातून दिग्दर्शनाकडे

निर्माते-दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ या सिनेमात अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली दिव्या खोसला नंतर दिग्दर्शनाकडे वळली. पदार्पणातच ‘यारीयां’सारखा हिट सिनेमा देणाऱ्या दिव्यानं ‘सनम रे’ या सिनेमांचंही दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळं मूळात अभिनेत्री असली तरी सध्या तिने दिग्दर्शनावरच लक्ष केंद्रीत केलं आहे. अशात फॅशन शोमध्ये तिचं कॅट वॉक करणं अनेकांना नवल वाटावं असंच आहे.


दिव्या डॉलसारखी

दिव्यानं पर्निया पॉप-अप शोसाठी रॅम्प वॉक केलं आहे. यावेळी तिनं मेटेलिक मिंट आऊटफिट परिधान केलं होतं. फॅशन डिझायनर समंत चौहाननं डिझाइन केलेल्या या आऊटफिटमध्ये दिव्या एखाद्या डॉलसाऱखी भासत होती. त्यामुळं रॅम्पवर चालायला सुरुवात करताच उपस्थितांना तिच्या सौंदर्याचा जलवा पाहायला मिळाला.


मेटेलिक मिंट रंगाचा गाउन

यावेळी दिव्याने मेटेलिक मिंट रंगाच्या पँटसोबतच एक टोन ऑफ-शोल्डर सेमी गाउन परिधान केला होता. एखाद्या शानदार पार्टी परफेक्ट असलेल्या या आऊटफिटमध्ये दिव्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. त्यातच तिला करण्यात आलेला लाइट मेकअप आणि ब्राइट लिप्सचं कॉम्बिनेशन लक्ष वेधून घेत होतं.


लुक घायाळ करणारा 

फॅशन शोमध्ये कॅट वॉक करण्याचा दिव्याचा हा पहिलाच अनुभव नाही. यापूर्वीही तिने काही अनुभवी डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक करत शो स्टॉपरची भूमिका बजावली आहे. यात नीता लुल्ला, प्रिया कटारिया-पुरी, रीना ढाका, पार्वती दासारी या भारतातील आघाडीच्या फॅशन डिझायनर्सचा समावेश आहे. असं असलं तरी मुंबईत झालेल्या पर्निया पॉप-अप शोमध्ये तिचा लुक घायाळ करणारा होता.हेही वाचा -

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

बाबूजींचा सांगितीक प्रवास उलगडणार ‘आनंदयात्री’संबंधित विषय
ताज्या बातम्या