Advertisement

१२ वर्षांनंतर अजय-काजोल एकत्र, 'तानाजी' चित्रपटातील काजोलचा मराठमोळा अंदाज

आता या चित्रपटातील काजोलचा लूक समोर आला आहे. चित्रपटात काजोलनं तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालसुरेंची भूमिका साकारली आहे.

१२ वर्षांनंतर अजय-काजोल एकत्र, 'तानाजी' चित्रपटातील काजोलचा मराठमोळा अंदाज
SHARES

'तानाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून अजय देवगण आणि काजोल ही रिअल लाईफ जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्ट लूक आपण सगळ्यांनी पाहिलाच आहे. आता या चित्रपटातील काजोलचा लूक समोर आला आहे. चित्रपटात काजोलनं तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालसुरेंची भूमिका साकारली आहे.

काजोल आणि अजय देवगण या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटातील काजोलचा लूक रिव्हील केला आहे. काजोलनं आपला लूक शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मैं आपको हारने नहीं दुंगी...' याशिवाय चित्रपटातील पोस्टरमध्ये काजोल मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. तिच्या डोक्यावर पदर, नाकात पारंपरिक नथ आणि कपाळावर मोठी टिकली दिसतेय.

तर अजय देवगणनं काजोलचा लूक त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, सावित्रीबाई मालसुरे - तानाजीके साहस का सहारा... और उनके बल की शक्ती...


तानाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतनं केलं आहे. १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानं सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.



सड्डा नाम 'लाल सिंह चड्डा'

'गुड न्यूज' चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा