Advertisement

'मान्सून शूटआऊट'मध्ये नवाजुद्दीनचा गँगस्टर लूक!


'मान्सून शूटआऊट'मध्ये नवाजुद्दीनचा गँगस्टर लूक!
SHARES

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या 'मान्सून शूटआऊट' या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. 'मान्सून शूटआऊट' या चित्रपटात नवाजुद्दीनचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये नवाज एकही शब्द बोलताना दिसत नाही. त्याच्या चेहऱ्यावरील क्रूर हावभावच खूप बोलके आहेत. अमित कुमार हे 'मान्सून शूटआऊट' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.




'मान्सून शूटआऊट' एक क्राइम ड्रामा असून त्यात नवाज प्रोफेशनल किलरची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटात नवाजुद्दीनचा 'गँग्स ऑफ वासेपूर'सारखा अवतार पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये काही हिंसक दृश्य देखील पाहायला मिळत आहेत.

पोस्टर आणि टीझरनंतर मान्सून शूटआऊट चित्रपटातील गाणं देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पल' असे या गाण्याचे बोल आहेत. अरजित सिंहने हे गाणे गायले आहे.

चित्रपटात नवाजुद्दीन सोबत विजय वर्मा, नीरज काबी आणि तनीषा चॅटर्जी झळकणार आहेत. येत्या 15 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा

सायना नेहवालनंतर 'या' बॅडमिंटनपटूवर बनणार बायोपिक!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा