Advertisement

लॉकडाऊनमुळे 'या' क्षेत्रातील 2.5 कोटी नोकऱ्या संकटात

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लाॅकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार, उद्योग-धंदे ठप्प झाल्याचा मोठा फटका बसणार आहे. अनेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर यामुळे गदा आली आहे.

लॉकडाऊनमुळे 'या' क्षेत्रातील 2.5 कोटी नोकऱ्या संकटात
SHARES

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लाॅकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार, उद्योग-धंदे ठप्प झाल्याचा मोठा फटका बसणार आहे. अनेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर यामुळे गदा आली आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका ट्रॅव्हल, टूरिझम आणि विमानसेवा व्यवसायाला बसला आहे. या क्षेत्रातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. या तिन्ही क्षेत्रातील 2.5 कोटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संकटात आहेत. 

या क्षेत्रामध्ये जवळपास 6.2 कोटी लोकांना रोजगार मिळतो. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्टने असोसिएशनने जारी केलेल्या अहवालातून ही गंभीर बाब समोर आली आहे. लॉकडाउनमुळे अनेक देशातील विमान सेवा बंद असल्याने या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या क्षेत्रातील महसूलात 2019 च्या तुलनेत यंदा 44 टक्क्यांची घट येईल. त्यामुळे या व्यवसायाला 252 बिलियन डॉलरचा तोटा या वर्षात सहन करावा लागू शकतो, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.

अहवालानुसार, एप्रिल ते जून या कालावधीमध्ये विमान प्रवासाची मागणी 70 टक्क्यांनी घसरू शकते. लॉकडाउनमुळे कोट्यवधींचं नुकसान होणाऱ्या विमान कंपन्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा केली आहे. या 21 दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात विमान क्षेत्राला 75 ते 80 हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दिवसागणिक हे नुकसान 150 कोटी रुपये आहे. तर जगभरात सुमारे 21 लाख कोटींच्या नुकसानाची शक्यता आहे.

 लॉकडाउनचा कालावधी वाढला तर विमान कंपन्यांचं आणखी नुकसान होईल. जर लॉकडाउन तीन महिन्यांपर्यंत वाढला तर आर्थिक वर्ष 2020 च्या शेवटच्या 3 महिन्यात आणि आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या 3 महिन्यात इंडिगो आणि स्पाइसजेट या एअरलाइन्सचं नुकसान जवळपास 1.25 ते 1.50 बिलियन डॉलर असेल. अशा परिस्थितीत छोट्या एअरलाइन्सकडे सध्या उपलब्ध असणाऱ्या ठेवी संपून जाऊन एअरलाइन्स बंद पडण्याचा धोका असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

लॉकडाऊनमुळे 80 हजार नोकऱ्यांवर गदा

Coronavirus Updates: दक्षिण मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २५० वर

राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा