Advertisement

लॉकडाऊनमुळे 80 हजार नोकऱ्यांवर गदा

कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. याचा विपरीत अनेक क्षेत्रांमध्ये होणार आहे.

लॉकडाऊनमुळे 80 हजार नोकऱ्यांवर गदा
SHARES

कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. याचा विपरीत अनेक क्षेत्रांमध्ये होणार आहे. किरकोळ व्यापार क्षेत्रात 80 हजार नोकऱ्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने केलेल्या  सर्व्हेमध्ये ही माहिती दिली आहे. कोरोनाचा व्यापारावर होणारा परिणाम तपासण्यासाठी रिटेलर्स असोसिएशनने सर्व्हे केला आहे. 768 किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता.

रिटेलर्स असोसिएशनच्या सर्व्हेनुसार, छोटे किरकोळ व्यापारी 30 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकतात. मध्यम स्तरावरील किरकोळ व्यापारी 12 टक्के तर मोठे किरकोळ व्यापारी 5 टक्के लोकांना नोकरीवरून काढू शकतात. किरकोळ व्यापारामध्ये सरासरी 20 टक्के नोकऱ्यांची कपात होऊ शकते. जवळपास 78,592 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.  सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांमध्ये छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांची संख्या 65 टक्के आहे. मधल्या स्तरावर असणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 100 ते 1000 दरम्यान आहे. तर 1000 पेक्षा जास्त कर्मचारी असणारे व्यापारी मोठे व्यापारी आहेत.

जीवनावश्यक वस्तू किंवा अन्नपदार्थ वगळता सर्वच दुकानं बंद आहे. देशातील 95 टक्के दुकानं बंद आहेत. नफा घटणार असल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवली आहे. सरकारने मदत केल्यास कमीत कमी लोकांना नोकरीवरून काढण्यात येईल असं या सर्व्हेत सांगण्यात आले आहे.



हेही वाचा -

संपूर्ण धारावी केली सील, 2 नवे रूग्ण आढळले

भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट

परळच्या बेस्ट वसाहतीतील ६० कुटुंबांचं विलगीकरण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा