Advertisement

BSNL चे 'इतके' कर्मचारी व्हीआरएससाठी इच्छुक

बीएसएनएल (BSNL) चे १ लाख कर्मचारी व्हीआरएस घेण्यास पात्र आहेत. कंपनीला आशा आहे की यापैकी ७० ते ८० हजार कर्मचारी व्हीआरएस घेतील.

BSNL चे 'इतके' कर्मचारी व्हीआरएससाठी इच्छुक
SHARES

 सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL) कडे दोनच दिवसात २२ हजार कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस (ऐच्छिक सेवानिवृत्ती) साठी अर्ज केला आहे. बीएसएनएलचे १ लाख कर्मचारी व्हीआरएस घेण्यास पात्र आहेत. कंपनीला आशा आहे की यापैकी ७०  ते ८० हजार कर्मचारी व्हीआरएस घेतील. इतक्या कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतल्यास बीएसएनएलची ७ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व कर्मचारी या योजनेत ऐच्छिक सेवानिवृत्ती घेऊ शकतात.

बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीके पूर्वावार यांनी म्हटलं की,  व्हीआरएस योजना ५ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत चालू राहील. सर्व फील्ड युनिट्सना कर्मचाऱ्यांना या योजनेची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बीएसएनएलच्या एकूण दीड लाख कर्मचाऱ्यांपैकी एक लाख कर्मचारी व्हीआरएस घेण्यास पात्र आहेत.  ही आतापर्यंत सरकारने दिलेली सर्वोत्कृष्ट व्हीआरएस योजना आहे. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी याकडं सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे.

या योजनेस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईत सेवा पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षासाठी ३५ दिवसांचा पगार आणि सेवानिवृत्तीच्या उर्वरित प्रत्येक वर्षासाठी २५ दिवसांचा पगार जोडला जाणार आहे. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने (एमटीएनएल) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस योजना आणली आहे. ही योजना व्हीआरएसच्या गुजरात मॉडेलवर आधारित आहे. ही योजना ३ डिसेंबरपर्यंतही खुली असेल.



हेही वाचा  -

SBI चं कर्ज झालं स्वस्त, 'इतके' घटवले व्याजदर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा