Advertisement

खूशखबर! पीएफवर मिळणार ८.६५ टक्के व्याज

२०१७-१८ मध्ये पीएफवरील व्याजदर ८.५५ टक्के होता. मागील ५ वर्षातील हा सर्वात कमी व्याजदर होता.

खूशखबर! पीएफवर मिळणार ८.६५ टक्के व्याज
SHARES

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांसाठी आता खूशखबर आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी पीएफवर ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं पीएफवरील व्याजदरवाढीला मंजुरी दिल्याची माहिती मंगळवारी रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली.

६ कोटी सदस्यांना फायदा

२०१७-१८ मध्ये पीएफवरील व्याजदर ८.५५ टक्के होता. मागील ५ वर्षातील हा सर्वात कमी व्याजदर होता. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने मागील आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याजदरास फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता. ईपीएफओच्या ६ कोटींहून अधिक सदस्यांना याचा लाभ होणार आहे.  २०१६-१७ मध्ये पीएफवरील व्याजदर ८.६५ टक्के, २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये कर्मचाऱ्यांना ८.७५ टक्के व्याज मिळाला होता. २०१२-१३ मध्ये ८.५ टक्के व्याज देण्यात आला होता. हेही वाचा -

२६ सप्टेंबरपासून आठवडाभर बँका बंद
संबंधित विषय
Advertisement