Advertisement

२६ सप्टेंबरपासून आठवडाभर बँका बंद

पुढील महिन्यातही संपावर जाण्याचे संकेत संघटनांनी दिले आहेत. पाच दिवसांचा आठवडा करावा अशीही मागणी बँक कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे बँक कर्मचारी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनिश्चित कालासाठी संपावर जाऊ शकतात.

२६ सप्टेंबरपासून आठवडाभर बँका बंद
SHARES

केंद्र सरकारने दहा सरकारी बँकांचं विलीनीकरण करून चार मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटनांनी विरोध दर्शविला आहे. या संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे २६ सप्टेंबरपासून बँका आठवडाभर बंद असणार आहेत. त्यामुळे बँक खातेदारांना चांगला त्रास सहन करावा लागणार आहे.  खातेदारांनी २५ सप्टेंबरपर्यंत आपले बँक व्यवहार केल्यास या त्रासापासून त्यांना वाचता येईल. 


या दिवशी बँका बंद

बँक संघटनांनी येत्या २६ आणि २७ सप्टेंबरला संप पुकारला आहे. त्याच्या पुढच्या दिवशी २८ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २९ सप्टेंबरला रविवार असे सुट्टीचे दिवस लागून आले आहेत. तर सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे ३० सप्टेंबर आणि १ आॅक्टोबरला बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २ आॅक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे संप आणि सुट्टीमुळे बँका आठवडाभर बंद असतील. 


अघोषित संपाचे संकेत 

पुढील महिन्यातही संपावर जाण्याचे संकेत संघटनांनी दिले आहेत. पाच दिवसांचा आठवडा करावा अशीही मागणी बँक कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे बँक कर्मचारी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनिश्चित कालासाठी संपावर जाऊ शकतात. या संपात केवळ सरकारी बँकांतील कर्मचारी सहभागी होणार आहेत. परंतु, खासगी बँका सुरू राहणार आहेत.


संघटनांच्या मागण्या 

 • बँकांचे विलीनीकरण करू नये 
 • ५ दिवसांचा आठवडा करावा
 •   बँकांमध्ये नोकरभरती करावी
 • आरबीआयच्या नियमानुसार निवृत्तीवेतन द्यावे 
 • रोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावी 
 • एनपीएस रद्द करावा 
 • वेतन आणि पगारात बदल करावे
 • ग्राह

  पुढील महिन्यातही संपावर जाण्याचे संकेत संघटनांनी दिले आहेत. पाच दिवसांचा आठवडा करावा अशीही मागणी बँक कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे बँक कर्मचारी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनिश्चित कालासाठी संपावर जाऊ शकतात. 

  कांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावी 

 


 

संबंधित विषय
Advertisement