एसबीआय ग्राहकांना एटीएम सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही, 'इथून'ही काढू शकता पैसे


SHARE

आता तुम्हाला छोट्याछोट्या कारणांसाठी पैसे हवे असतील तर एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. पैसे हवे असतील तर जवळच्या किराणा स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही पैसे घेऊ शकता. ही सेवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांसाठी आहे.

किराणा स्टोअरमधून करत असलेल्या ट्रान्झॅक्शनसाठी दुकानदाराला पैसे देण्याची गरज नाही. पण बँक ट्रान्झॅक्शनसाठी १ टक्के रक्कम शुल्क आकारेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार हे शुल्क कमीत कमी ७ रुपये ५० पैसे ते जास्तीत जास्त १० रुपये इतकं असेल. यामध्ये दिवसाला कमीत कमी १०० रुपये आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये काढता येतील.

एखाद्या दुकानदाराकडून तुम्हाला काही खरेदी करायचं असल्यास या सेवेचा वापर करू शकता. त्यामुळे दुकानदाराला दररोज त्याची रोकड बँकेत जमा करण्याची गरज नाही. पण दुकानदाराकडून काही खरेदी केली नाहीत तरीही तुम्ही पॉइंट ऑफ सेलच्या मदतीनं पैसे काढू शकता.हेही वाचा


संबंधित विषय
ताज्या बातम्या