Advertisement

PMC नंतर आणखी एक बँक बुडीत

आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आपला कारभार संपवण्याची जाहीर घोषणा केली होती.

PMC नंतर आणखी एक बँक बुडीत
SHARES

PMC बँक घोटाळ्यानंतर आणखी एक बँक सध्या आर्थिक संकटात अडकली आहे. या बँकेला रिझर्व्ह बँकेने  आपला कारभार संपवण्यासाठी परवानगी दिली आहे.  संकटात सापडलेली ही बँक उद्योगपती आदीत्य बिर्ला यांची आयडिया पेमेंट्सही आहे. या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर त्यातील पैसे काढा कारण ही बँक लवकरच त्यांचा कारभार बंद करणार आहे.

आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आपला कारभार संपवण्याची जाहीर घोषणा केली होती. तसेच त्यांनी ही माहिती देताना, काही आकस्मिक घटनांमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं सांगितलं होतं. आयडिया सेल्युलरने आयडिया मोबाइल कॉमर्स सर्व्हिसेस ही कंपनी पेमेंट बँकेत एप्रिल २०१६ मध्ये विलीन केली. त्यानंतर त्याला आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक असं नाव देण्यात आलं. आणि या बँकेला २०१५ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पेमेट बँकेचं लायसन्स मिळालं होतं. महत्त्वाचे म्हणजे आता ही पेमेंट बँक बंद झाल्यानंतर एअरटेल, पेटीएम, जिओ, इंडिया पोस्ट यासारख्या प्रमुख कंपन्यांची पेमेंट बँक सेवा उपलब्ध असेल. बँकेने आपल्या ग्राहकांना दिलेल्या संदेशानुसार त्यांनी आपला बॅलन्स लवकरात लवकर ट्रान्सफर करावा अथवा खात्यातून लवकरात लवकर पैसे काढावे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा