Advertisement

रिलायन्स जिओचा आणखी एक करार, अमेरिकन कंपनी सिल्व्हर लेकची 5655 कोटींची गुंतवणूक

काही दिवसांपूर्वीच फेसबुकने रिलायन्स जिओबरोबर एक मोठा करार केला होता. त्यानंतर आता जिओने आणखी एका कंपनीसोबत करार केला आहे.

रिलायन्स जिओचा आणखी एक करार, अमेरिकन कंपनी सिल्व्हर लेकची 5655 कोटींची गुंतवणूक
SHARES

काही दिवसांपूर्वीच फेसबुकने रिलायन्स जिओबरोबर एक मोठा करार केला होता.  त्यानंतर आता  मुकेश अंबानी यांच्या जिओने आणखी एका कंपनीसोबत करार केला आहे. अमेरिकन कंपनी सिव्हर लेक जिओ मध्ये 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या कराराची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने सोमवारी केली. 

या गुंतवणुकीमुळे जिओमध्ये सिल्व्हर लेकची 1.15 टक्के भागीदारी होईल. करारानंतर जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू 4.90 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू 5.15 लाख कोटी झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. टेक्नॉलॉजी आणि फायनान्समध्ये सिल्वर लेक कंपनी लोकप्रिय आहे. सिल्वर लेक टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीत जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. यापूर्वी सिल्वर लेकने अलीबाबा ग्रुप, एअरबीएनबी, डेल टेक्नॉलॉजी, अँट फायनान्शियल , अल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटर यांसारख्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे.

 दोन आठवड्यांपूर्वीच फेसबुकनेही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. जिओमध्ये तब्बल 5.7 बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक फेसबुकने केली.  या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुकची 9.99 टक्के भागीदारी झाली आहे. 22 एप्रिलला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फेसबुकने या गुंतवणुकीची घोषणा केली होती. ही भारतातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक होती.



हेही वाचा -

मुंबई, पुण्यातील रेड झोनमध्येही ४ मेपासून मद्यविक्री सुरू

तर, ११ लाख परप्रांतीयांना सोडण्यासाठी लागतील इतक्या ट्रेन आणि बस..




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा