Advertisement

१ डिसेंबरपासून रिलायन्सची व्हाॅईस काॅलिंग बंद

रिलायन्स कम्युनिकेशनची व्हाॅईस कॅलिंग सेवा १ डिसेंबरपासून बंद होणार असून कंपनीची केवळ ४ जी डेटा सर्व्हिस सुरू राहणार आहे.

१ डिसेंबरपासून रिलायन्सची व्हाॅईस काॅलिंग बंद
SHARES

आर्थिक तोटा सहन करत असलेल्या अनिल अंबानी समुहाच्या रिलायन्स कम्युनिकेशनची व्हाॅईस कॅलिंग सेवा १ डिसेंबरपासून बंद होणार असून कंपनीची केवळ ४ जी डेटा सर्व्हिस सुरू राहणार आहे. यासंदर्भातील माहिती कंपनीने दूरसंचार नियामक प्राधिकरण ‘ट्राय’ला कळवली असून या कंपनीच्या ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत दुसऱ्या नेटवर्कमध्ये जाता येईल.


सेवा कुठे सुरू?

अार काॅमने ट्रायला दिलेल्या माहितीनुसार कंपनी केवळ आंध्रप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश (पूर्व आणि पश्चिम विभाग), तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या ८ सर्कलमध्ये २ जी आणि ४ जी डेटा सर्व्हिस सुरू ठेवणार आहे. तर सिस्टेमा श्याम टेलिसर्व्हिसेस कंपनीसोबत मिळून दिल्ली, राजस्थान, उ. प्रदेश (पश्चिम विभाग), तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, प. बंगाल, गुजरात आणि कोलकातामध्ये सीडीएमए सर्व्हिस सुधारणार आहे.

त्यानुसार 'ट्राय'ने आर काॅमला निर्देश दिले आहेत की त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत नंबर पोर्टेबिलीटीसाठी कुठल्याही ग्राहकाचा अर्ज नामंजूर करू नये.


४६ हजार कोटींचं कर्ज

अनिल अंबानी समुहाच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सवर ४६ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. कर्ज कमी करण्यासाठी कंपनीने टॅवर बिझनेस आणि रियल इस्टेट बिझनेस विकरण्याचे तसेच स्पेक्ट्रम आप्टीमायझेशनमधून बचत करून २५ हजार कोटी रुपये उभारण्याची योजना होती. यामुळे कर्जाचा डोंगर निम्म्याने कमी होण्याची अपेक्षा होती.


विलिनीकरणाचा व्यवहार फिस्कटला

परंतु काही दिवसांपूर्वी एअरसेलसोबतचा विलिनीकरणाचा करार फिस्कटल्याने कंपनीपुढील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. भारतातील टेलिकॅम क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि बँकांकडून कर्ज मिळवण्यास होत असलेली अडचण यामुळे हा व्यवहार होऊ शकला नाही. तरी सध्या कंपनी सिस्टेमा श्याम टेलिसर्व्हिसेस कंपनीसोबत विलिनीकरार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.


तिसऱ्या तिमाहीतही फटका

आर कॅमला जून तिमाहीत १, २१० कोटी रुपयांचा संकलित तोटा झाला. सलग तिसऱ्या तिमाहीत आर कॅमला तोटा सहन करावा लागला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा