Advertisement

Apple आयफोन १२ सिरीजचं उत्पादन भारतात होणार?

अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी Apple नं आता चीनला (China) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

Apple आयफोन १२ सिरीजचं उत्पादन भारतात होणार?
SHARES

अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी Apple नं आता चीनला (China) मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, Apple कंपनी आता आयफोन, आयपॅड, मॅक आणि इतर वस्तूंच चीनमधील उत्पादन केंद्र इतरत्र हालवणार आहे. Apple कंपनी आता लवकरच आपल्या पहिल्या 5G स्मार्टफोन आणि आयफोन १२ (iPhone १२) सीरीजच्या उत्पादनाला भारतात सुरू करणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, Apple कंपनीच्या आयपॅडचं उत्पादन व्हिएतनाममध्ये होणार आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत हे उत्पादन सुरू होणार आहे. Apple कंपनी पहिल्यांदाच चीनबाहेर एवढ्या मोठ्या संख्येनं उत्पादन तयार करणार आहे.

Apple कंपनी भारतातही आयफोनचं उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयफोन १२ च्या सीरीजचं उत्पादन याच तिमाहीत सुरू केलं जाणार आहे. अॅपल कंपनीचे फोन तयार करण्याचं सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं उत्पादन केंद्र भारत आहे.

Apple कंपनीचे स्मार्ट स्पीकर्स, इयरफोन आणि संगणक या वस्तूंच उत्पादन वाढवण्यावरही कंपनी भर देत आहे. Apple कंपनीच्या उत्पादन केंद्रात फेरबदल करणं हा कंपनीच्या रणनीतीचा हा एक भाग आहे. २०२१ मध्ये या क्षेत्रात तेजी येईल, हे यामागचं गणित आहे.Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा