'उद्योजकांची दिवाळी पहाट’

फोर्ट - अर्थसंकेतकडून 18 ऑक्टोबर रोजी 'उद्योजकांची दिवाळी पहाट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेंशन हॉल इथं पार पडला. या कार्यक्रमाचे मिडिया पाटनर 'मुंबई लाइव्ह' होते. दिवाळी पहाट २०१६ या कार्यक्रमांतर्गत तरूण उद्योजकांना संकल्पना मांडायला व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे सोहळ्याला मोठ्या संख्येनं तरूण उद्योजक उपस्थित होते.

लघू आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, दलित चेंबर ऑफ कॉमर्स, ख्रिश्चन चेंबर ऑफ कॉमर्स, TSSIA, IMC, FICCI, BMA, NSIC, मराठी व्यापारी व्यावसायिक मित्र मंडळ अशा बिझनेस क्लबचं मोठं योगदान आहे. त्यामुळे यावर्षी अर्थसंकेततर्फे प्रत्येक बिझनेस क्लबच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Loading Comments