Advertisement

बँक, विमा कर्मचारी ८ जानेवारीला संपावर

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे ८ जानेवारीला बँक कर्मचारी आणि विमा कंपन्यातील कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

बँक, विमा कर्मचारी ८ जानेवारीला संपावर
SHARES

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे ८ जानेवारीला बँक कर्मचारी आणि विमा कंपन्यातील कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रीय व्यापार संघटनेच्या या संपात बँकींग क्षेत्रातील प्रमुख कामगार संघटना सहभागी होणार आहेत. संपामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात हा संप केला जाणार असल्याचं अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे महासचिव सी.एच.व्यंकटचलम यांनी सांगितलं आहे. कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचं संरक्षण, रोजगारनिर्मिती आणि कामगार कायद्यात बदल थांबवण्याच्या मागण्या यावेळी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बँक कर्मचाऱ्यांच्या एआयबीईए, एआयबीओए, बीईएआय, आयएनबीईएफ आणि आयएनबीओसी या संघटना या संपामध्ये सहभागी होणार आहेत. तसंच रिझर्व्ह बँकेचे कर्मचारीही या संपात सहभागी होणार असल्याचा दावा व्यंकटचलम यांनी केला आहे. याव्यतिरिक्त सहकारी बँक, ग्रामीण बँक, एलआयसी आणि सामान्य विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनीही या संपाचं समर्थन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.


हेही वाचा -

क्रेडिट कार्ड कर्जामुऴे त्रस्त असाल तर पाळा या टिप्स

देशातील मोठ्या बँकांचे असे आहेत एफडीचे दर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा