Advertisement

बँक आॅफ महाराष्ट्रचे कर्ज स्वस्त

सार्वजनिक क्षेत्रातील बँक आॅफ महाराष्ट्रने आपल्या कर्जावरील दरांमध्ये कपात केली आहे.

बँक आॅफ महाराष्ट्रचे कर्ज स्वस्त
SHARES

सार्वजनिक क्षेत्रातील बँक आॅफ महाराष्ट्रने आपल्या कर्जावरील दरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे बँकेचे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे. बँकेने रेपो दराशी संलग्न व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात केली आहे. बँकेने एमसीएलआर दरातही ०.२५ टक्के कपात केली आहे. यामुळे एक वर्ष मुदतीचा एमसीएलआर आता ८ टक्के झाला आहे. यापूर्वी तो ८.२५ टक्के होता. याशिवाय सहा महिन्यांसाठीचा एमसीएलआर७.८० टक्के केला आहे. यामुळे नव्याने कर्ज घेणाऱ्यांना आता कमी दरात कर्ज मिळणार आहे.

बँक आॅफ महाराष्ट्रने किरकोळ कर्जे रेपो दराशी  ॉसंलग्न केली आहेत. त्यामुळे शैक्षणिक कर्जे, गृह कर्ज, वाहन कर्ज तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीची कर्जे रेपोशी संलग्न कर्जदराने दिली जातात. त्यामुळे या कर्जांचा व्याजदर आता पाव टक्क्याने कमी होईल. या निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळाला आहे.

रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी रेपो दरात कपात केली होती. त्यामुळे आरबीआयकडून बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त होणार आहे. बँकांची याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी आपले कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा यासारख्या बँकांनी कर्जदरात कपात करून यापूर्वीच ग्राहकांना दिलासा दिला आहे.


हेही वाचा -

आरोग्यंमत्र्यांनी दिली तबलिगी नेत्यांना समज, म्हणाले...

मरकजला गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क न केल्यास कठोर कारवाई, मुंबई महापालिकेचा इशारा

 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा