Advertisement

लांबणीवर टाकलेल्या ईएमआयवर द्यावं लागणार व्याज

सरकारी बँकांनी ग्राहकांना ईएमआय भरण्यासाठी 3 महिन्यांचा दिलासा दिला आहे. मात्र हा दिलासा ग्राहकांसाठी फायद्याचा ठरणारा नाही.

लांबणीवर टाकलेल्या ईएमआयवर द्यावं लागणार व्याज
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी बँकांनी आपल्या ग्राहकांना 3 महिन्यांची सवलत द्यावी असं आवाहन रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना केलं होतं. या आवाहनाला सरकारी बँकांनी प्रतिसाद देत ग्राहकांना ईएमआय भरण्यासाठी 3 महिन्यांचा दिलासा दिला आहे. मात्र हा दिलासा ग्राहकांसाठी फायद्याचा ठरणारा नाही. 3 महिने ईएमआय भरण्यास सवलत दिली असली तरी 3 महिन्यांनंतर बँका या थकलेल्या ईएमआयवर व्याज वसूल करणार आहेत. 

 एसबीआय, कॅनरा बॅंक, आयडीबीआय, एचडीएफसी, पंजाब नॅशनल, इंडियन बँक, युको बँक,अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया आणि बॅंक ऑफ बडोदाने पुढील तीन महिने मासिक हप्ता न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बँकांकडून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तीन महिने हप्ता भरला नाही तरी चालणार आहे. मात्र आता कर्जदारांसमोर दुसरं आव्हान निर्माण झालं आहे. तीन महिने कर्जाचे ईएमआय नंतर भरताना या सर्वच महिन्याचे ईएमआय व्याजासह भरावे लागणार आहेत. बँका या थकलेल्या हप्त्यांवर व्याज आकारणार आहेत. 

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या सूचनेत म्हटलं आहे की, सूट दिलेल्या काळातील सर्वच रकमेवर व्याज वाढत राहील. हे वाढलेलं व्याज कर्जदारांकडून अतिरिक्त ईएमआयद्वारे वसूल करणार आहेत. दरम्यान या काळात जे ग्राहक आपल्या कर्जाचे हफ्ते भरत आहेत ते नियमितपणे आपले हफ्ते भरू शकतात. 

 महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध प्रकारचे ईएमआय भरण्याचे दिवस सुरु होतात. 27 मार्चला रिझर्व बॅंकेनं तीन महिने कर्जाचे हप्ते देण्याची सक्ती करु नका असे निर्देश दिले होते. परंतु अंतिम निर्णय बॅंकावर सोडला होता. अनेक बँकांनी पुढच्या तीन महिन्यासाठी हप्ते न देण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार कर्जाचा कालावधी पुढे तीन महिने वाढवला जाईल असं देखील नमूद केलं आहे. ही मुभा 1 मार्च ते 31 मे या कालावधीसाठी असणार आहे.हेही वाचा -

पीएनबी बनली देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोेठी बँक

कोरोनामुळं पश्चिम रेल्वेला २०७ कोटींचा फटका

गरजूंसाठी सौरव गांगुलीनं दिले २ हजार किलो तांदूळ
संबंधित विषय
Advertisement