Advertisement

EMI स्थगित करण्याच्या नावाखाली फसवणूक, बँकांचा ग्राहकांना सावधगिरीचा अलर्ट

3 महिन्यांसाठी ईएमआय स्थगित करण्यासाठी बँकांकडून ग्राहकाच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर तसा मेसेज पाठवण्यात येत आहे. मात्र, काही भामटे या परिस्थितीचा फायदा घेत लोकांना लुबाडत असल्याचं समोर आलं आहे.

EMI स्थगित करण्याच्या नावाखाली फसवणूक, बँकांचा ग्राहकांना सावधगिरीचा अलर्ट
SHARES

आरबीआयने कर्जावरील ईएमआय भरण्यासाठी 3 महिन्यांची सवलत दिली आहे. त्यामुळे 3 महिन्यांसाठी ईएमआय स्थगित करण्यासाठी बँकांकडून ग्राहकाच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर तसा मेसेज पाठवण्यात येत आहे. मात्र, काही भामटे या परिस्थितीचा फायदा घेत लोकांना लुबाडत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बँकांनी त्यांच्या ग्राहकांना सतर्क राहण्यासाठी अलर्ट पाठवला आहे. 

 फसवणूक करणारे ग्राहकांना त्यांचे ईएमआय स्थगित करण्यासाठी ओटीपी किंवा पिन मागण्यासाठी कॉल करत आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढले जात आहेत. त्यामुळे अशी संवेदनशील मागणी ग्राहकांनी या भामट्यांना देऊ नये याकरता अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय तसंच जवळपास सर्व बँकांनी याबाबत ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. ईएमआय सवलतीचा फायदा घेत ग्राहकांना लुबाडण्याचं काम सुरू आहे अशी माहिती या अलर्टमध्ये देण्यात आली आहे.

अ‍ॅक्सिस बँकेने मेल करून सुरू असलेल्या फसवणुकीबाबत माहिती दिली आहे. फसवणूक करणारे ईएमआयमध्ये सवलत मिळवून देतो सांगत ओटीपी, सीव्हीव्ही किंवा पिन मागत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. तुम्ही माहिती दिलीत तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो, असं बँकेने म्हटलं आहे. अ‍ॅक्सिस बँकेप्रमाणेच इतर बँकांनीही मेसेज, मेल किंवा अ‍ॅपद्वारे नोटिफिकेशन पाठवून यासंदर्भात माहिती दिली आहे.

एसबीआयने ट्वीट करत ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पीआयबी फॅक्ट चेख (PIB Fact Check) आणि एसबीआयने याबाबत ग्राहकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. PIB Fact Check ने एसबीआयचं ट्वीट रीट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.



हेही वाचा

वाधवान प्रकरणावर मुख्यमंत्री गप्प का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

लॉकडाऊनमध्ये वाढदिवसाची पार्टी, भाजप नगरसेवकाला अटक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा