Advertisement

वाधवान प्रकरणावर मुख्यमंत्री गप्प का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

येस बँक आणि डीएचएफएल घाेटाळ्यातील जामिनावर असलेल्या वाधवान बंधूंचं (wadhawan brother) प्रकरण राज्यभर गाजत असताना मुख्यमंत्री उद्वव ठाकरे या प्रकरणावर गप्प का? असा सवाल विधासनभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी विचारला आहे?

वाधवान प्रकरणावर मुख्यमंत्री गप्प का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल
SHARES

येस बँक आणि डीएचएफएल घाेटाळ्यातील जामिनावर असलेल्या वाधवान बंधूंचं (wadhawan brother) प्रकरण राज्यभर गाजत असताना मुख्यमंत्री उद्वव ठाकरे या प्रकरणावर गप्प का? असा सवाल विधासनभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी विचारला आहे? 

नोकरशहा स्वत:वर संकट ओढवून घेत नाहीत

ऐन संचारबंदीच्या काळात आर्थिक घोटाळ्यांचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंना महाबळेश्वरला जाण्यास परवानगी कशी मिळते, यामध्ये कुणाचा हात असू शकतो, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी ५ वर्षे मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद सांभाळलं आहे. त्यामुळे या विभागाचं कामकाज कसं चालतं? पोलीस खातं कसं काम करतं? हे सगळं मला माहिती आहे. 

हेही वाचा- शरद पवारांच्या सांगण्यावरून वाधवान कुटुंबाला पत्र? किरीट सोमय्यांचा प्रश्न

वाधवान प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (principal secretary amitabh gupta) हे एक जबाबदार अधिकारी आहेत. पुढं काय होईल ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही चिंता करू नका, असं जोपर्यंत त्यांना सरकारमधील कुठल्याही नेत्याकडून सांगितलं जात नाही; तोपर्यंत त्यांच्यासारख्या मोठ्या पदावरील कुठलाही अधिकारी स्वत:हून अशी जोखीम अंगावर घेऊ शकत नाही.

गृहविभाग राष्ट्रवादीकडे 

संपूर्ण पोलीस विभाग, प्रधान सचिव हे गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात, त्यामुळे हे आदेश कुणी दिले याचा खुलासा त्यांनी करायला हवा. गृहमंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात वजन असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा या प्रकरणाला आशीर्वाद आहे का? याचाही खुलासा व्हायला हवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गृहखातं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच काम करतं, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी देखील याविषयी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. केवळ नाराजी दाखवून मुख्यमंत्री गप्प बसू शकत नाहीत, त्यांनी या प्रकरणी उत्तर द्यायलाच पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.  

हेही वाचा- सोमय्या बेजबादार वक्व्यांसाठी प्रसिद्ध, त्यांना गांभीर्याने घेत नाही- नवाब मलिक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा