Advertisement

का भरायचा इन्कम टॅक्स रिटर्न? जाणून घ्या कारण आणि फायदे

आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, उत्पन्नाचा एक ठोस पुरावा तुम्ही सादर केलेला असतो. जर तुम्ही रिटर्न दिलेल्या मुदतीत भरला नाही तर तुम्हाला मोठा दंड चुकवावा लागू शकतो. आयकर रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत.

का भरायचा इन्कम टॅक्स रिटर्न? जाणून घ्या कारण आणि फायदे
SHARES

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत जवळ आली आहे. आयटीआर भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत आहे. या कालावधीनंतर आयटीआर भरल्यास दंड द्यावा लागेल. मात्र, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आयटीआर भरण्याची गरज आहे का? भरला नाही तर काय होईल? तुमच्या या शंका आम्ही दूर करू.

जर तुम्हाला नोकरी, व्यवसायातून करमुक्त मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असेल तर तुम्हाला आयकर (प्राप्तिकररिटर्न भरावा लागेल. आयकर रिटर्न भरणे आणि आयकर भरणे यामध्ये फरक आहे. आयकर रिटर्न भरण्याचा अर्थ म्हणजे सरकारला तुम्ही तुमचे उत्पन्न, खर्च, गुंतवणूक याची माहिती देणे हा आहे. आयकर रिटर्न भरल्यावर जर तुमचे उत्पन्न करमुक्त उत्पन्नापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला कर द्यावा लागेल. एका आर्थिक वर्षात जर उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे.

आर्थिक वर्षात जर तुमचे उत्पन्न फक्त शेती आणि शेतीशी संबंधित असेल, तसंच तुमचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला आयकर रिटर्न भरावा लागणार नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच ६० वर्षांच्या वरील नागरिकांसाठी ही मर्यादा तीन लाख रुपये आहे. तर ८० वर्षांच्या वरील नागरिकांसाठी ५ लाख रुपये आहे. पण तुम्ही झिरो रिटर्न भरू शकता. झिरो रिटर्नमुळे आयकर विभागाच्या नजरेत तुमचे रेकाॅर्ड चांगले राहील.

आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, उत्पन्नाचा एक ठोस पुरावा तुम्ही सादर केलेला असतो. जर तुम्ही रिटर्न दिलेल्या मुदतीत भरला नाही तर तुम्हाला मोठा दंड चुकवावा लागू शकतोआयकर रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे आपण जाणून घेऊयात.


) कर्ज मिळणं सुलभ

जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर  आयकर रिटर्न हा तुमचा उत्पन्नाचा ठोस पुरावा आहे. गृहकर्ज तसंच वाहन कर्जासाठी बँक तुमच्याकडे २ ते ३ वर्षांचे आयकर रिटर्न मागते. जर तुमच्याकडे आयटीआरची काॅपी असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळेल.


) क्रेडिट कार्डसाठी

आयटीआरमुळे क्रेडिट कार्डही सहजपणे मिळू शकेलक्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांना आयकर रिटर्नमुळे ग्राहकांच्या कर्ज घेण्याच्या आणि फेडण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो.


) व्यवसायासाठी लाभदायक

व्यवसाय सुरू करण्यासाठीही आयटीआर महत्वाचे आहे. याशिवाय जर तुम्हाला कोणत्या विभागाकडून कंत्राट मिळवायचं असेल तर तेव्हाही आयटीआर दाखवावे लागते. कोणत्याही सरकारी विभागाकडून कंत्राट मिळवण्यासाठी मागील ५ वर्षांचे आयकर रिटर्न द्यावे लागते.


) व्यवहारांमध्ये फायदेशीर

 मोठ्या पैशांच्या व्यवहारांमध्ये आयटीआरची मोठी मदत होते. वेळेवर आयटीआर भरल्यामुळे प्रॉपर्टी खरेदी - विक्री, बँकेत मोठी रक्कम जमा करणे, म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येण्याची भिती राहणार नाही. नियमीत आयकर रिटर्न भरणारे लोक या भितीपासून दूर राहतील.

) टीडीएस क्लेम

तुमच्या उत्पन्नावर टीडीएस कापला असेल तर तो परत मिळवण्यासाठी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही फ्री लान्सिंग किंवा घरून काम करत असाल आणि तुमचे उत्पन्न करपात्र नसले तरीही तुम्हाला वेतन देणारा टीडीएस कापू शकतो. अशावेळी आयकर रिटर्न भरून तुम्ही टीडीएस रिफंड घेऊ शकता.

) अधिक विमा संरक्षण

तुम्हाला १ कोटी रुपयांचा विमा (टर्म प्लान) घ्यायचा असेल तर विमा कंपनी तुमच्याकडे आयटीआर मागू शकते. तुमच्या उत्पन्नाचा  स्रोत माहिती करून घेण्यासाठी आणि नियमीत उत्पन्नाची खात्री होण्यासाठी विमा कंपनी आयटीआरवरच विश्वास ठेवतात.


) व्हिजा मिळणं सोपं

जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचं असेल तर तुमच्यासाठी आयटीआर महत्त्वाचे आहे. बहुतांशी परदेशी दुतावास व्हिजा अर्जात मागील २ वर्षांचे आयकर रिटर्न मागतात. जर तुमच्याकडे आयटीआर असेल तर इतर लोकांच्या तुलनेत तुम्हाला व्हिजा मिळणे सोपे होते.

) दंडापासून सुटका

आयकर रिटर्न भरण्यास वेळ लागला तर तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. वेळेवर आयटीआर भरून तुम्ही दंडापासून वाचू शकता. मुदतीत आयटीआर भरल्यास आयकर विभागाकडून नोटीस येण्याची भितीही राहणार नाही.

) वास्तव्याचा पुरावा

आयकर रिटर्नची काॅपी हा तुमच्या वास्तव्याचा ठोस पुरावा आहे. याचा वापर तुम्ही सरकारी कामातही करू शकता. तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तुम्ही वास्तव्याचा पुरावा म्हणून आयटीआर काॅपी देऊ शकता.हेही वाचा  -

गृहकर्जावरील कर सवलतीचा लाभ घ्यायचाय? मग जाणून घ्या 'ह्या' अटी

व्याजदर घटले तरी लघु बचत योजना आकर्षकच
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा