Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,44,710
Recovered:
56,85,636
Deaths:
1,16,026
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,807
666
Maharashtra
1,39,960
9,830

गृहकर्जावरील कर सवलतीचा लाभ घ्यायचाय? मग जाणून घ्या 'ह्या' अटी

गृहकर्जावरील कर कपातीचा फायदा मिळवण्यासाठी काही अटी आणि नियम करदात्यांना पाळावे लागणार आहे. कर कपातीचा दावा करण्याआधी या ५ अटी आणि नियम जाणून घेणे करदात्यांना आवश्यक आहेत.

गृहकर्जावरील कर सवलतीचा लाभ घ्यायचाय? मग जाणून घ्या 'ह्या' अटी
SHARES

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात गृहकर्जावरील व्याजावर दीड लाख रुपयांची अतिरिक्त कर सवलत देण्याचे जाहीर केले. या आधी गृहकर्जाच्या व्याजावर दरवर्षी २ लाख रुपयांची प्राप्तिकर सवलत प्राप्तिकर कायद्याच्या कलम २४ नुसार मिळत होती. अतिरिक्त दीड लाख रुपयांची कर सवलत प्राप्तिकर कायद्याचे नवीन कलम ८० ईईएनुसार मिळणार आहे. त्यामुळे करदात्यांना आता गृहकर्ज व्याजावर साडेतीन लाख रुपयांची कर सवलत मिळणार आहे.

यानुसार कर्जाच्या१५ वर्षाच्या कालावधीत मध्यम वर्गातील घर खरेदीदारांना जवळपास ७ लाख रुपयांचा फायदा होणार आहे. मात्र, कर कपातीचा फायदा मिळवण्यासाठी काही अटी आणि नियम करदात्यांना पाळावे लागणार आहे. कर कपातीचा दावा करण्याआधी या ५ अटी आणि नियम जाणून घेणे करदात्यांना आवश्यक आहेत.


) कर कपातीचा लाभ घ्यायचा असेल तर कर्जदारांना १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत गृहकर्ज मंजूर व्हावे लागेल. ३१ मार्च २०१९ च्या अाधी घेतलेल्या कर्जावर कर सवलत मिळणार नाही.

) घराचे स्टॅम्प ड्युटी मूल्य ४५ लाख लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये. म्हणजेच खरेदी केलेल्या घराची किंमत ४५ लाख रुपयांपर्यंतच असली पाहिजे. यापेक्षा अधिक किमतीच्या घर खरेदीसाठी कर सवलतीचा दावा तुम्हाला करता येणार नाही.

) कर्ज मंजूर झालेल्या तारखेला करदात्याच्या नावावर दुसरे घर असता कामा नये. याचाच अर्थ ज्या करदात्याजवळ आतापर्यंत कोणतेही घर नाही त्यालाच या कर सवलतीचा लाभ मिळणार आहे.

) जर तुम्ही आधीच प्राप्तिकर कायद्यातील एखाद्या कलमाखाली व्याजाच्या रकमेवर कर सवलत घेतली असेल तर प्राप्तिकर कायद्यातील दुसऱ्या कोणत्याही कलमाखाली त्याच व्याजाच्या रकमेवर कर सवलतीचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच एकाच व्याजाच्या रकमेवर कलम २४ आणि कलम ८० ईईएनुसार एकाच वेळी कर सवलतीसाठी दावा करू शकत नाही.

) जर मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, एनसीआर, हैदराबाद या महानगरांमध्ये तुम्ही घेतलेल्या घराचा कार्पेट आकार ६० चौरस मीटर (६४५ चौरस फूट) पेक्षा अधिक नसेल तर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल. तर या महानगरांशिवाय इतर शहरांमध्ये घेतलेल्या घराचा कार्पेट आकार ९० चौरस मीटर (९६८ चौरस फूट) पेक्षा कमी असेल तरच कर सवलतीचा दावा करता येईल. या पेक्षा अधिक आकारांच्या घरावर कर सवलत मिळणार नाही.हेही वाचा  -

जाणून घ्या कसा वाचेल तुमचा आयकर

श्रीमंतांना द्यावा लागणार अमेरिकेपेक्षाही अधिक कर
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा