Advertisement

काबूल ते मुंबई कार्गो सेवेचा व्यापाराला फायदा


काबूल ते मुंबई कार्गो सेवेचा व्यापाराला फायदा
SHARES

अफगाणिस्तानच्या वाणिज्‍य शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली. काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरू झाल्याने अफगाणिस्तान आणि भारताचे उद्योग-व्यापारविषयक संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केला. या दोन्ही देशात पर्यटनाला चांगला वाव आहे. त्यामुळे दोन्ही देशादरम्यान व्यापार विषयक देवाण-घेवाण वाढायला हवी. त्यासाठी विविध शहरे विमान सेवेने जोडली पाहिजेत, म्हणजे उद्योग-व्यवसायाला चालना मिळून पर्यटन क्षेत्राचा विकास होईल, असं त्यांनी सांगितलं.



आयात निर्यातीला चालना मिळणार

काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरू झाल्याने फळे आणि भाजीपाला आयात-निर्यातीला चालना मिळणार आहे. नुकतेच जवळपास ४० टन सफरचंद घेऊन अफगाणिस्तानातून मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे विविध फळे, सुकामेवा येथील बाजारपेठेत नियमित उपलब्ध होतील. भारतातील केळी आणि द्राक्षाला चांगली मागणी असल्याचं अफगाण शिष्टमंडळाने चर्चा करताना सांगितलं. अफगाणिस्तानचे व्यापारी शिष्टमंडळ आणि मुंबईतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांची एकत्रित बैठक घेऊन फळे, भाजीपाला आणि अन्य जिवनावश्यक वस्तुंची देवाण-घेवाण वाढवण्याबाबत चर्चा घडवून आणण्याच्या सूचना यावेळी राज्यपाल सी. विद्यासागरराव यांनी दिल्या.


दहशतवाद संपवणे हेच उद्दिष्ट्य

भारताने जवळपास १६ हजार अफगाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली आहे. पुणे, मुंबई आणि अन्य शहरात ते उच्च शिक्षण घेत आहेत. भारताने अफगाणिस्तानात अनेक शाळा सुरू केल्या आहेत. दहशतवाद संपवणे हे दोन्ही देशाचे उद्दिष्ट्य आहे. व्यापार आणि उद्योग व्यवसायात दोन्ही देशांनी चांगली भरारी घेतली तर अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा