बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा नागरिकांकडून निषेध


बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा नागरिकांकडून निषेध
SHARES

लोअर परळ - केंद्र सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करत नवीन नोटा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी देशभरातील सर्व बँकाना रात्री आठ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिलेत. पण खूप गर्दी आहे, कॅश कमी आहे, अशी फुटकळ कारणं दाखवून परळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची मुजोरी सुरुच आहे. गेले दोन दिवस सदर बँकेचे कर्माचारी त्यांच्या नियमित वेळेप्रमाणे संध्याकाळी चार वाजताच बँक बंद करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ महाराष्ट्र परळ शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा जाहीर निषेध केला आहे. या कर्मचाऱ्यांवर शासनानं कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित विषय