Advertisement

नोटायणानं आणलं कुटुंबाला एकत्र


SHARES

जुहू गल्ली - 500 आणि 1000 च्या नोटांवरील बंदीचा सर्वसामान्यांना काही प्रमाणात त्रास झाला. एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगा लागत होत्या. एका दिवसात फक्त 2500 रुपयेच एटीएममधून काढता येणार होते. अशा परिस्थितीत लग्नकार्य किंवा बाराव्याच्या विधी कसा होणार, असा प्रश्न अनेकांना पडला. पण या परिस्थितीतून अंधेरीच्या जुहू गल्लीत राहणाऱ्या चौहान कुटुंबानं मार्ग शोधला. राजेश चौहान यांचे काका लक्ष्मण यांचं हार्ट अटॅकनं निधन झालं. चौहान कुटुंबियांकडे त्यांचा बारावा करायलाही पैसे नव्हते कारण बँकेतून फक्त 6500 रुपयेच काढता आले. इतक्या पैशात बाराव्याचा विधी करणंही अवघड झालं होतं. मात्र या परिस्थितीवर मात करून त्यांनी चांगला आणि सोपा मार्ग शोधला. सगळ्या कुटुंबानं एकत्र येत 500 जणांचं जेवण तयार केलं. त्यामुळे कॅटरिंगचे पैसेही वाचले आणि एकूणच बाराव्यासाठी पैसेही कमी लागले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा