Advertisement

शिक्षकांसाठी कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना


शिक्षकांसाठी कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना
SHARES

मुंबई - शिक्षकांसाठी कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना सुरू करण्याची शिक्षक भारतीची मागणी अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत गुरुवारी मान्य केली. मार्चपासून ही योजना सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत आणि कपिल पाटील यांच्या लक्षवेधी सुचनेवर ते उत्तर देत होते. मूळ उत्तरात शिक्षणमंत्र्यांनी विमा योजनेचा उल्लेख केला होता. विमा योजनेला शिक्षकांचा विरोध आहे. पोलिसांप्रमाणे शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना सुरू करावी, हा आग्रह कपिल पाटील यांनी धरला तेव्हा पोलिसांप्रमाणे योजना सुरू होईल, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.
शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकिय प्रतीपूर्ती ऐवजी कॅशलेस मेडिकल कार्ड सुरू करण्याची योजना सरकारला दोन वर्षापूर्वी सादर केली होती. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या आद्यशिक्षिकांच्या नावानं ही योजना सुरू करण्याची शिक्षक भरतीची मागणी आहे. अन्य काही संघटनांनी मेडीक्लेम विमा योजना मागितली होती. मात्र सरकारनं अखेर शिक्षक भारतीची योजना मान्य केल्याबद्दल आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षणमंत्र्यांचे आभार मानले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा