एटीएमचा वापर करताना काय काळजी घ्याल?

 Pali Hill
एटीएमचा वापर करताना काय काळजी घ्याल?
एटीएमचा वापर करताना काय काळजी घ्याल?
एटीएमचा वापर करताना काय काळजी घ्याल?
एटीएमचा वापर करताना काय काळजी घ्याल?
एटीएमचा वापर करताना काय काळजी घ्याल?
See all

मुंबई - केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर एटीएमसमोर सगळीकडेच रांगा लागलेल्या दिसतायत. हव्या तेवढ्या 100च्या नोटा बाजारात उपलब्ध नसल्यामुळे जे लोक एरवी एटीएम वापरत नव्हते, तेही आता नाईलाजानं एटीएमचाच वापर करतायत.

पण एटीएमचा वापर करताना निष्काळजीपणा संकटाला आमंत्रण ठरू शकतो. तसं होऊ नये, यासाठी काही उपाय आहेत. त्यांचं काटेकोर पालन केल्यास घाबरायचं कारण नाही, अशी खात्री टॉप्स ग्रुप इंडियाचे सीइओ नीरज बिजलानी यांनी दिलीये.

काय आहेत हे उपाय...

-एटीएमचा पिन वारंवार बदलणं

-शक्यतो स्वत:च्या बॅंकेचे एटीएम वापरा, जणेकरून तुमची गोपनीयता कायम राहील

-तुम्ही वरचेवर परदेशी जात नसाल तर बॅंकेला तुमचं कार्ड परदेशात वापरापासून मज्जाव करा (ब्लॉक करा), तुम्ही परदेशी गेल्यास तुम्ही कधीही कार्ड अनब्लॉक करू शकता.

-एटीएमचा वापर करताना सतर्क राहा, तुम्ही एटीएम वापरताना आत कुणी नाही याची काळजी घ्या

-डेबिट कार्ड परदेशात वापरल्यास परत आल्यावर पिन तात्काळ बदला

-कार्डांसंबंधी काही विसंगती आढळल्यास किंवा एखादं संशयास्पद ट्रॅन्झॅक्शन वा फोन आल्यास तात्काळ बॅंकेशी संपर्क साधा

-तुमच्या कॉप्युटरमधील अँटी व्हायरस अप- टू- डेट ठेवा, स्पायवेअर आणि मालवेअर डिटेक्शनचा वापर करा आणि तुमचा कॉम्प्युटर नेहमी अपडेट ठेवा.

काय टाळायला हवं?

-पासवर्ड ठेवताना तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबीयांच्या नावाचा किंवा तारखांचा उल्लेख टाळा.

-आर्थिक माहिती मागणारे ई-मेल्स उघडणे टाळा

-तुमच्या खात्यासंबधीची कोणतीही माहिती ईमेल द्वारे, मेसेजवर किंवा फोनवर सांगू नका

-कोणत्याही दुकानदाराला तुमचा कार्ड नंबर किंवा पिन देऊ नका

-तुमच्या गैरहजेरीत कुणालाही कार्ड स्वाइप करण्यास देऊ नका

-एटीएम कार्ड आणि रिसीट वेगळी ठेवा, रिसीट एटीएममध्येच टाकून जाऊ नका

-एटीएममध्ये किंवा दुकानात पासवर्ड टाकताना कुणी बघत नाही, याची काळजी घ्या

-एटीएममधील लाइट्स बंद असल्यास वापर टाळा

Loading Comments