Advertisement

नवा 'आयटीआर' फाॅर्म आला, ३१ आॅगस्टपर्यंत करा रिटर्न फाईल

नवीन फाॅर्म प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील अंदाजे ३ कोटी करदात्यांना 'सहज' हा केवळ एका पानाचा फाॅर्म डाऊनलोड करून आॅनलाइन भरता येईल.

नवा 'आयटीआर' फाॅर्म आला, ३१ आॅगस्टपर्यंत करा रिटर्न फाईल
SHARES

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळा(सीबीडीटी)ने मंगळवारी आर्थिक वर्ष २०१८-१९ करीता एका पानाचा प्राप्तकर परतावा फाॅर्म १ (आयटीआर) सादर केला आहे. या फाॅर्ममध्ये करदात्यांना वाढलेल्या वेतनासोबत अन्य तपशील भरावे लागतील. हा फाॅर्म वार्षिक ५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी असेल. या फाॅर्मद्वारे करदात्यांना
३१ आॅगस्टपर्यंत कर परताव्या (इन्कम टॅक्स रिटर्न)साठी अर्ज करता येईल.

हा नवीन फाॅर्म प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील अंदाजे ३ कोटी करदात्यांना 'सहज' हा केवळ एका पानाचा फाॅर्म डाऊनलोड करून आॅनलाइन भरता येईल.


उत्पन्नाचा तपशील

या फाॅर्ममध्ये करदात्याला आपल्या उत्पन्नाचा तपशील द्यावा लागेल. नोकरदार व्यक्तीला सॅलरी ब्रेक-अप द्यावा लागेल. पूर्वीच्या फाॅर्ममध्ये हा तपशील द्यावा लागत नव्हता. सोबतच घर भाड्याने दिलं असेल, तर त्यातून मिळणारं उत्पन्न किंवा इतर गुंतवणुकीच्या व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशीलही द्यावा लागेल.


कशासाठी नवीन आयटीआर?

नवीन 'आयटीआर'मध्ये २५ नवीन बदल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. नोंदणी नसलेल्या कंपन्या, ट्रस्ट आणि करदात्यांचा तपशील मिळवणं हा या मागचा 'सीबीडीटी'चा उद्देश असल्याचं म्हटलं आहे. त्याचसोबत उद्योजकांचा तपशील मिळवून त्यांचा प्राप्तिकर आणि त्यांच्या कंपनीतर्फे भरण्यात येणारा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यांचा मेळ घालणं सरकारला सोपं जाईल, असं एका कर सल्लागाराने सांगितलं.


नवी बदल कुठले?

नवीन फाॅर्ममध्ये जेंडरचा काॅलम काढून टाकण्यात आला आहे. यामुळे आता कुणालाही पुरूष/महिला असं फाॅर्ममध्ये नमूद करावं लागणार नाही. अनिवासी भारतीयांसाठी आयटीआर २ किंवा आयटीआर ३ फाॅर्म भरता येईल. यंदा नोटाबंदी दरम्यान किती रोख पैसे जमा केले, याची माहिती नमूद करणारा विशेष काॅलम काढून टाकण्यात आला आहे.

ज्यांचं उत्पन्न ५ लाखांपर्यंत आहे, असं हिंदू अविभाजीत कुटुंब आणि ८० वर्षांवरील करदात्यांना आयटीआर फाॅर्म ४ वैयक्तिकरित्या भरून द्यावा लागेल. काही अपवाद वगळता सर्वांना हा फाॅर्म आॅनलाइन भरावा लागेल.



हेही वाचा-

क्रिप्टोकरन्सीच्या खरेदीवर आरबीआयची बंदी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा