Advertisement

क्रिप्टोकरन्सीच्या खरेदीवर आरबीआयची बंदी

आरबीआयने बिटकाॅइन सारख्या क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. गुरूवारी द्विमासिक पतधोरण जाहीर करताना आरबीआयने ही घोषणा केली. आरबीआयचे हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. यामुळे आता देशातील कुठल्याही बँकेतून कुठल्याही बँक ग्राहकाला व्हर्च्युअल करन्सीची ट्रेडिंग करता येणार नाही.

क्रिप्टोकरन्सीच्या खरेदीवर आरबीआयची बंदी
SHARES

रिझर्व्ह बँके (आरबीआय)ने भारतातील कुठल्याही बँकेच्या खात्यातून बिटकाॅइन सारख्या क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. गुरूवारी द्विमासिक पतधोरण जाहीर करताना आरबीआयने ही घोषणा केली. आरबीआयचे हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. यामुळे आता देशातील कुठल्याही बँकेतून कुठल्याही बँक ग्राहकाला व्हर्च्युअल करन्सीची ट्रेडिंग करता येणार नाही.


काय आहेत आरबीआयचे निर्देश?

आरबीआयच्या कक्षेत येणाऱ्या बँका, पेमेंट बँका, मोबाइल वाॅलेट, मनी ट्रान्सफरची सुविधा देणाऱ्या कंपन्या, वित्तीय संस्था यापैकी कुणालाही क्रिप्टोकरन्सी सारख्या व्हर्च्युअल करन्सीची खरेदी वा विक्री करता येणार नाही. त्याचसोबत क्रिप्टोकरन्सीच्या खात्यात पैसे टाकता येणार नाही किंवा काढताही येणार नाही. अशी कुठलीही नवीन सेवा कुणालाही सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.


काय म्हणणं आहे आरबीआयचं?

पतधोरण आढावा धोरण जाहीर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरबीआयने स्पष्ट केलं की, सध्या जगभरातील क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रचंड चढ-उतार बघायला मिळत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आरबीआय अंतर्गत येणाऱ्या कुठल्याही बँका, वित्तीय संस्था, वाॅलेट चालवणाऱ्या कंपन्यांवर व्हर्च्युअल करन्सीच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे.


काय आहे क्रिप्टोकरन्सी?

क्रिप्टोकरन्सी ही एक व्हर्ज्युअल करन्सी आहे. इंटरनेटद्वारे नियंत्रीत होणाऱ्या या करन्सीची सुरूवात २००९ साली बिटकाॅइनच्या माध्यमातून झाली होती. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही व्यक्तीला या व्हर्च्युअल करन्सीने पैसे पाठवता येतात. महत्त्वाचं म्हणजे या व्यवहारावर कुठल्याही बँकेचं नियंत्रण नसतं. केवळ दोन व्यक्तींमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून हा थेट व्यवहार होतो.हेही वाचा-

महागाई वाढू नये म्हणून व्याजदर स्थिर

गुड न्यूज! कार, बाईकचा इन्श्युरन्स स्वस्तसंबंधित विषय
Advertisement