गूड न्यूज! पीपीएफवर मिळणार ८ टक्के व्याजदर!! इतर योजनांवर किती...वाचा


SHARE

केंद्र सरकारने पीपीएफ, एनसीएस, सुकन्या समृद्धी योजना इ. छोट्या बचत योजनांवरील व्याजदरांत ०.४० टक्क्यांपर्यंत वाढ करत छोटे गुंतवणूकदार आणि नोकरदारांना गणेशोत्सवात गूड न्यूज दिली आहे. ही व्याजदरवाढ २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान लागू असेल.


दर ३ महिन्यांना आढावा

छोट्या बचत योजनांवरील व्याजदरांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येतो. त्यानुसार मागील अनेक महिन्यांपासून व्याजदर स्थिरच होते. किंबहुना जानेवारी ते मार्च २०१८ या तिमाहीत व्याजदर घटवण्यात आले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजी होती. ही नाराजी या व्याजदरवाढीमुळे काही प्रमाणात दूर होईल, असं म्हटलं जात आहे.


कुठल्या योजनांचा समावेश?

या योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), सुकन्या समृद्धी याेजना, पोस्टाच्या मुदत ठेवी (टीडी), रिकरिंग डिपाॅझिट (आरडी), मंथली इन्कम अकाऊंट आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा समावेश आहे.


किती व्याजदरवाढ?

अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार यापुढं 'पीपीएफ' ७.६ टक्क्यांऐवजी ८ टक्के व्याजदर मिळेल. किसान विकास पत्रावर (११८ महिन्यांसाठी) ७.३ टक्क्यांऐवजी ७.७ टक्के व्याज (११२ महिन्यांसाठी) मिळेल. सुकन्या समृद्धी योजनेवर ८.१ टक्क्यांऐवजी ८.५ टक्के व्याज मिळेल. एनएससीवर ८ टक्के व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८.७ टक्के व्याज मिळणार आहे. सरकारने बचत खात्यावरील व्याजदरांत कुठलीही वाढ केलेली नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच या खात्यातील रकमेवर ४ टक्के व्याज मिळेल.


योजनापूर्वीचे व्याजदर (टक्क्यांमध्ये)नवे व्याजदर (टक्क्यांमध्ये)
कम्पाऊंडिंग
बचत खाते४.०४.०वार्षिक
टाइम डिपाॅझिट (TD) १ वर्ष६.६६.९तिमाही
टाइम डिपाॅझिट (TD) २ वर्षे
६.७७.०तिमाही
टाइम डिपाॅझिट (TD) ३ वर्षे
६.९७.२तिमाही
टाइम डिपाॅझिट (TD) ५ वर्षे
७.४७.८तिमाही
रिकरिंग डिपाॅझिट (TD) ५ वर्षे६.९७.३तिमाही
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ५ वर्षे८.३८.७तिमाही, मॅच्युरिटी 
मासिक उत्पन्न योजना (MIS) ५ वर्षे७.३७.७तिमाही, मॅच्युरिटी
एनएससी ५ वर्षे७.६८.००वार्षिक
पीपीएफ७.६८.००वार्षिक
किसान विकास पत्र (केव्हिपी)७.३ (मॅच्युरिटी ११८ महिने)७.७ (मॅच्युरिटी ११२ महिने)वार्षिक
सुकन्या समृद्धी योजना८.१८.५वार्षिक

हेही वाचा-

तीन बँकांचं विलिनीकरण १ एप्रिलपासून होण्याची शक्यता

सोन्या-चांदीला झळाळी, किती रुपयांनी महागलं? वाचा...संबंधित विषय
ताज्या बातम्या