Advertisement

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समधील १० टक्के हिस्सा केंद्र सरकार विकणार

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) मधील १० टक्के हिस्सा केंद्र सरकार विकणार आहे.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समधील १० टक्के हिस्सा केंद्र सरकार विकणार
SHARES

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) मधील १० टक्के हिस्सा केंद्र सरकार विकणार आहे. शेअर बाजारातील शेअर्स विकून ही १० टक्के निर्गुंतवणूक केली जाणार आहे.

त्यासाठी सार्वजनिक उपक्रम गुंतवणुकीचा कायदेशीर सल्ला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्याचा अनुभव असलेल्या सल्लागार संस्थेची निवड करण्यात येणार आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने अनुभवी कायदेशीर सल्लागार संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ही रसायन आणि खत मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली खते आणि केमिकल उत्पादन करणारी कंपनी आहे. आरसीएफमध्ये केंद्र सरकारचा ७५ टक्के हिस्सा आहे. १० टक्के हिस्सा विकून सरकारला  ३०० कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. 

मुंबईतील ट्रॉम्बे आणि रायगड जिल्ह्यातील थळ येथे या कंपनीचे दोन कारखाने आहेत. या ठिकाणी युरिया, जैविक खते, सुक्षम पोषक द्रव्य, पाण्यात विरघळणारी खते, मातीचे कंडिशनर आणि औद्योगिक रसायने तयार केली जातात. 



ही वाचा -

लोकलमध्ये लवकरच उपलब्ध होणार वायफाय

मुंबई ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टवर बंदी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा