Advertisement

लोकलमध्ये लवकरच उपलब्ध होणार वायफाय

लोकल प्रवासात प्रवाशांना मोबाइलवर करमणुकीचे कार्यक्रम पाहता येणार आहेत.

लोकलमध्ये लवकरच उपलब्ध होणार वायफाय
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लोकल प्रवासात प्रवाशांना मोबाइलवर करमणुकीचे कार्यक्रम पाहता येणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेने लोकल डब्यांत वायफाय बसवण्याचे काम सुरू करण्यात आलं असून, ते अंतिम टप्प्यात आहे. येत्या १ ते दीड महिन्याच्या आत ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याचं समजतं.

लोकल प्रवासात अनेकजण करमणुकीसाठी मोबाइलवर चित्रपट, मालिका किंवा गाणी पाहत असतात. यासाठी मोबाइलवर इंटरनेट असणे गरजेचे आहे. इंटरनेट असले तरीही त्यात प्रवासादरम्यान अनेक अडथळे येतात व विनाअडथळा मोबाइलवर करमणुकीचे कार्यक्रम पाहता येत नाहीत. त्यामुळे अनेक जण मोबाइलमध्ये चित्रपट, मालिकाइत्यादी डाउनलोड करतात. परंतु यातून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे.

मध्य रेल्वेने ‘कंटेन्ट ऑफ डिमांड’ योजनेअंतर्गत डब्यांत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका कंपनीशी करारही के ला आहे. सध्या १६५ लोकल गाड्या ताफ्यात असून यातील लोकलच्या प्रत्येक डब्यात वायफाय बसवण्याचे काम केलं जात असल्याचं समजतं.

ज्या कंपनीला वायफायचे काम दिले आहे, त्यांच्याकडून मोबाइल अ‍ॅप बनवले जाणार आहे. अ‍ॅप डाउनलोड के ल्यानंतर प्रवाशांना कोणत्याही इंटरनेट डाटाची गरज लागणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अ‍ॅपमार्फत धार्मिक, राजकीय किंवा अश्लील विषयांशी संबंधित काही पाहता येणार नाही. मध्य रेल्वेने ही सुविधा देणाऱ्या कंपनीशी पाच वर्षांचा करार केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा