मुंबई ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टवर बंदी


मुंबई ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टवर बंदी
SHARES

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २९ जानेवारीपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स,  रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर बंदी घालण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारी म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून,या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भा.द.वि. १९६० कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचाः-भारत-इंग्लंड विमानसेवा 'ह्या' तारखेपासून पुन्हा सुरू

महाराष्ट्राच्या गुप्त विभागाला शंका आहे की, देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २६ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुश्चित प्रकार घडू नये. त्याच बरोबर अशा सोहळ्यावर दहशवादी हल्ला होण्याचे सावट असते. त्या पार्श्वभूमिवर हे आदेश निर्गमित केले जातात. गुप्तचर विभागाच्या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी करुन शहराच्या सर्व प्रमुख स्थानांच्या सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या डिप्टी कमिश्नर (ऑपरेशन) च्या कार्यालयाने जारी केलेल्या सतर्कतेनुसार दहशतवादी आणि राष्ट्रद्रोही लोक ड्रोन, रिमोट ऑपरेट मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरियल मिसाईल किंवा पॅरा ग्लायडरच्या माध्यमातून हा हल्ला करू शकतात. अलर्टमध्ये ही देखील शंका व्यक्त केली आहे की, दहशतवादी गर्दीच्या ठिकाणी आणि व्हीव्हीआयपीला निशाणा बनवू शकतात. कायदा व्यवस्था बिघडवण्यासोबतच सार्वजनिक संपत्तीलाही नुकसान पोहोचवले जाऊ शकते.

हेही वाचाः-पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ४९ नवीन कोरोना रुग्ण

गुप्तचर विभागाचे इनपुट लक्षात घेता पोलिसांनी मुंबईमध्ये कोणत्याही फ्लाइंग ऑब्जेक्ट (उडवले जाणारे उपकरणे इत्यादी)वर बंदी घातली आहे. पोलिसांनुसार हा आदेश पुढचा आदेश येईपर्यंत किंवा एक महिना लागू राहिल. जर एखाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्याविरोधात आयपीसीची कलम-१८८ नुसार केस दाखल केली जाऊ शकते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा