Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

तनिष्कच्या जाहीरातीला पाठिंबा देणारा चेतन भगत ट्रोल, त्याच्या टीकेवर नेटकरी संतापले

हिंदू-मुस्लिम असा संवेदनशील विषय जाहिरातीत असल्यानं तनिष्कला आपली जाहिरात मागे घ्यावी लागली. पण तनिष्कच्या या निर्णयावर चेतन भगत यांनी नाराजी व्यक्त केली.

तनिष्कच्या जाहीरातीला पाठिंबा देणारा चेतन भगत ट्रोल, त्याच्या टीकेवर नेटकरी संतापले
SHARES

सोशल मीडियात टाटा ग्रुपच्या दागिन्यांचा प्रसिद्ध ब्रँड तनिष्कनं केलेल्या एका जाहिरातीवरुन चांगलाच वाद निर्माण झाला. आता या वादात प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देखील उडी घेतली आहे. हिंदू-मुस्लिम असा संवेदनशील विषय जाहिरातीत असल्यानं तनिष्कला आपली जाहिरात मागे घ्यावी लागली. पण तनिष्कच्या या निर्णयावर चेतन भगत यांनी नाराजी व्यक्त केली.

आपल्या ट्विटमध्ये भगत यांनी म्हटलं की, डिअर तनिष्क तुमच्यावर यासाठी बहुतेक लोकं टीका करीत आहेत. कारण ते तुमचे दागिने विकत घेऊ शकत नाहीत. या अर्थव्यवस्थेला त्यांची विचारसरणी कुठे घेऊन जाईल हे यावरून कळते. ते रोजगार नसल्यामुळे नोकरीही करू शकत नसल्यामुळे ते भविष्यातही तनिष्कमधून दागिने खरेदी करण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांची चिंता करू नका.

चेतन भगत यांच्या या ट्विटनंतर नेटकरी त्यांच्यावर चांगलेच भडकले. ग्राहकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एक युझर म्हणाला की, याला काय माहिती आमच्या पीठ आणि तांदळाच्या डब्यांमध्ये बटाटे-टॉमेटोमाणे सोने आणि पैसे पडून असतात. अशा अनेकांनी चेतन भगतच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

जाहिरातीमध्ये एक हिंदू महिला दाखवण्यात आली आहे. त्या महिलेचं लग्न मुस्लिम कुटुंबात होतं. व्हिडीओमध्ये महिलेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. यादरम्यान मुस्लिम कुटुंबिय हिंदू प्रथेनुसार, आपल्या सुनेचं डोहाळे जेवण करताना दाखवलं आहे. व्हिडीओच्या शेवटी गरोदर महिला आपल्या सासूला विचारते की, 'आई ही प्रथा तुमच्या घरात तर होत नाही ना?' यावर तिची सासू म्हणते की, 'मुलींना खूश करण्याची प्रथा तर सगळ्याच घरांमध्ये असते ना?'

तनिष्कच्या या जाहिरातीमध्ये हिंदू-मुस्लिम एकता दाखवणाचा प्रयत्न या जाहीरातीतून करण्यात आला आहे. परंतु, या जाहिरातीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. ही जाहिरात लव जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप केला आणि ट्रोल करण्यास सुरुवात केली.हेही वाचा

TRP घोटाळ्यातील चॅनल्सवरील जाहिराती अमूल हटवण्याच्या विचारात

TRP घोटाळ्यातील न्यूज चॅनल्सना जाहिराती नाही, पार्ले कंपनीचा निर्णय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा