Advertisement

#BoycottTanishq या ट्रेंडनंतर तनिष्कनं 'ती' जाहिरात मागे घेतली

ट्विटरवर #BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेण्ड करत होता. त्यानंतर कंपनीनं प्रदर्शित केलेली आपल्या ब्रँडची जाहीरात मागे घेतली आहे.

#BoycottTanishq या ट्रेंडनंतर तनिष्कनं 'ती' जाहिरात मागे घेतली
SHARES

सोशल मीडियावर तनिष्कला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. तसेच तनिष्क बॉयकॉट करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे. ट्विटरवर #BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेण्ड करत होता. त्यानंतर कंपनीनं प्रदर्शित केलेली आपल्या ब्रँडची जाहीरात मागे घेतली आहे.

अनेकांनी तनिष्कनं प्रदर्शित केलेली जाहीरात ही लव जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याचा दावा केला. जाहिरात समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या जाहीराती विरोधात मोहीम सुरू केली आहे. #BoycottTanishq हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. तसंच ही जाहिरात लवकरात लवकर बंद करावी अशी मागणीही केली. जाहिरातीला होणारा विरोध पाहता तनिष्कनं जाहिरात मागे घेतली आहे.

जाहिरातीमध्ये एक हिंदू महिला दाखवण्यात आली आहे. त्या महिलेचं लग्न मुस्लिम कुटुंबात होतं. व्हिडीओमध्ये महिलेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. यादरम्यान मुस्लिम कुटुंबिय हिंदू प्रथेनुसार, आपल्या सुनेचं डोहाळे जेवण करताना दाखवलं आहे. व्हिडीओच्या शेवटी गरोदर महिला आपल्या सासूला विचारते की, 'आई ही प्रथा तुमच्या घरात तर होत नाही ना?' यावर तिची सासू म्हणते की, 'मुलींना खूश करण्याची प्रथा तर सगळ्याच घरांमध्ये असते ना?'

तनिष्कच्या या जाहिरातीमध्ये हिंदू-मुस्लिम एकता दाखवणाचा प्रयत्न या जाहीरातीतून करण्यात आला आहे. परंतु, या जाहिरातीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. ही जाहिरात लव जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप केला आणि ट्रोल करण्यास सुरुवात केली.

ट्रोल होणाऱ्या तनिष्कच्या जाहिरातीसंदर्भात काँग्रेस नेते शशि थरूर यांनीही एक ट्वीट केलं आहे. त्यांनी यासर्व प्रकारासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, 'अच्छा तर हिंदुत्व ब्रिगेडनं हिंदू-मुस्लिम एकतेला सुंदर पद्धतीनं सादर करण्यात आलेल्या या जाहिरातीमुळे तनिष्क ज्वेलरी बायकॉट करण्याची मागणी केली जात आहे. जर हिंदू-मुस्लिम यांच्यातील 'एकत्वम' संदर्भात त्यांना एवढाच त्रास असेल तर संपूर्ण जगभरात हिंदू-मुस्लिम यांच्यातील ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या भारतालाच बायकॉट का नाही करत?



हेही वाचा

TRP घोटाळ्यातील चॅनल्सवरील जाहिराती अमूल हटवण्याच्या विचारात

TRP घोटाळ्यातील न्यूज चॅनल्सना जाहिराती नाही, पार्ले कंपनीचा निर्णय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा