Advertisement

TRP घोटाळ्यातील चॅनल्सवरील जाहिराती अमूल हटवण्याच्या विचारात

आता पार्ले-जी पाठोपाठ दुग्धजन्य पदार्थ उत्पादक अमूलनंही या वादग्रस्त चॅनेल्सवरील आपल्या जाहिराती बंद करायचं ठरवलं आहे.

TRP घोटाळ्यातील चॅनल्सवरील जाहिराती अमूल हटवण्याच्या विचारात
SHARES

‘रिपब्लिक’सह काही चॅनेल्सवरच्या आपल्या जाहिराती बजाज ऑटोनं बंद केल्या. त्यानंतर पार्ले कंपनीनं देखील हाच निर्णय घेतला. आता पार्ले-जी पाठोपाठ दुग्धजन्य पदार्थ उत्पादक अमूलनंही या वादग्रस्त चॅनेल्सवरील आपल्या जाहिराती बंद करायचं ठरवलं आहे. या निर्णयाबद्दल त्यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

वादग्रस्त चॅनेल्सवरील जाहिरातींबाबत अमूल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनीही पुनर्विचार करण्यास कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. या जाहिरातींसाठी वृत्तवाहिन्या महत्त्वाचं माध्यम आहेत. पण जर वाहिन्यावर सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित होत असेल तर अमूल कंपनी अशा वर्तणुकीविरोधात वाहिन्यांवर दबाव आणू शकते.

रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन वाहिन्यांचा टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघड केल्यानंतर मोठमोठय़ा कंपन्या सावध झाल्या आहेत. या चॅनेल्सवरील जाहिराती थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. समाजात द्वेष पसरवणाऱ्या कंटेंटचा निषेध केला आहे.

पार्ले जी प्रोडक्टचे मार्केटींग हेड कृष्णराव बुद्ध यासंदर्भात म्हणाले की, सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा कटेंट प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर आमच्या कंपनीकडून जाहिरात प्रसारित करण्यात येणार नाही. आमच्या या निर्णयाचे स्वागत करून इतरही कंपन्यांनीही याचं अनुकरण करावं. या निर्णयामुळे टीव्ही चॅनेल्स त्यांच्या कंटेंटमध्ये बदल करतील.



हेही वाचा

ऑनलाइन पैसे पाठवण्याची ही' सेवा २४ तास सुरु होणार

केंद्र सरकारकडून उत्सव योजना, सणासाठी मिळणार १० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा