Advertisement

ऑनलाइन पैसे पाठवण्याची ही' सेवा २४ तास सुरु होणार

नोटाबंदीनंतर ग्राहकांनी रोख पैशाएेवजी ऑनलाईन बॅंकिंग व्यवहारांना पसंती दिली होती. त्यानंतर आरबीआयने डिजिटल बॅंकिंगला प्रोत्साहन देत एनईएफटी सेवा २४ तास उपलब्ध केली.

ऑनलाइन पैसे पाठवण्याची ही' सेवा २४ तास सुरु होणार
SHARES

ऑनलाइन पैसे पाठवण्याची आरटीजीएस ही बॅंकिंग सेवा डिसेंबरपासून आठवड्याचे सातही दिवस २४ तास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कधीही कोणत्याही वेळी मोठी रक्कम आरटीजीएसने पैसे पाठवता येणार आहे. याआधी एनईएफटीने २४ तास पैसे पाठवता येत होते.

नोटाबंदीनंतर ग्राहकांनी रोख पैशाएेवजी ऑनलाईन बॅंकिंग व्यवहारांना पसंती दिली होती. त्यानंतर आरबीआयने डिजिटल बॅंकिंगला प्रोत्साहन देत एनईएफटी सेवा २४ तास उपलब्ध केली. आता डिसेंबरपासून आरटीजीएस ही ऑनलाइन बॅंकिंग सेवा डिसेंबरपासून २४ तास सुरू होणार आहे. सध्या आरटीजीएसने बँकिंग कामकाजाच्या दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पैसे हस्तांतर करता येतात. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आरटीजीएस सेवा उपलब्ध नाही.

आरटीजीएसने एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येते. रिझर्व्ह बॅंकेने ठरवून दिलेल्या वेळेतच अशा प्रकारचे व्यवहार पूर्ण होतात. नेटबॅंकिंग करत असाल तर बॅंकेत न जाता ग्राहक आरटीजीएसचा पर्याय वापरून ज्यांना पैसे हस्तांतर करायचे आहेत त्या व्यक्तीचा खाते क्रमांक, बॅंक कोड देऊन पैसे पाठवता येतात. यामध्ये वेळेनुसार शुल्क वाढत जाते. सकाळच्या सत्रात कमी शुल्क असते. नंतर ते वाढत जाते. किमान २ लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून पाठवता येतात. 


हेही वाचा -

केम्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा