Advertisement

कोरोनाग्रस्तांसाठी देशातील पहिली इन्शुरन्स योजना लाँच

क्लिनिक हेल्थकेअरनं त्यांच्या COVID-19 ने संक्रमित असणाऱ्या ग्राहकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही योजना लाँच केली आहे. काय आहे ही योजना जाणून घ्या...

कोरोनाग्रस्तांसाठी देशातील पहिली इन्शुरन्स योजना लाँच
SHARES

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, क्लिनिक हेल्थकेअर (Clinikk Healthcare)नं याकरता पहिला काँप्रेहेंसिव्ह प्रोटेक्शन प्लॅन सुरू केला आहे. क्लिनिक हेल्थकेअरनं त्यांच्या COVID-19 ने संक्रमित असणाऱ्या ग्राहकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही योजना लाँच केली आहे.


‘कोरोना व्हायरस सपोर्ट प्लॅन’

क्लिनिक हेल्थकेअर या इन्शुरन्स कंपनीचे ग्राहक जर कोरोनाबाधित असतील तर, या आजारासंबधित गरजांसाठी 360 डिग्री कव्हरेज ‘कोरोना व्हायरस सपोर्ट प्लॅन’मधून देण्यात येणार आहे. 499 रुपयांपासून हा प्लॅन उपलब्ध आहे आणि वेबसाइटवरून क्षणार्धात हा प्लॅन मिळवता येऊ शकतो.


नेमका प्लॅन काय आहे?

‘कोरोना व्हायरस सपोर्ट प्लॅन’मध्ये प्राथमिक देखभाल आणि आर्थिक सुरक्षा दोघांचाही समावेश आहे. ग्राहकांना पूर्ण उपचार मिळतात, ज्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला, २४ तास डॉक्टरांची मदत आणि कोरोना व्हायरससंबधित रुग्णालयामध्ये भर्ती झाल्यानंतर त्यासंबधित कोणत्याही खर्चावर १ लाख रुपयांपर्यंतचे विमा कव्हर उपलब्ध आहे. कंपनी एक ऑल इन वन सोल्यूशन सुद्धा देत आहे. बिझनेस किंवा कॉर्पोरेट सेक्टरसाठी हा प्लॅन तयार करण्यात आला आहे.


इन्शुरन्स प्लॅन

जगभरात कोरोना व्हायरसंबधित रुग्णाची संख्या २ लाखांहून अधिक आहे. चीनमध्ये हजारोंचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये देखील मृतांचा आकडा वाढत आहे. भारतामध्ये अद्याप कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये या इन्शुरन्स कंपनीकडून ४९९ रुपयांपासून इन्शुरन्स प्लॅन आखण्यात आले आहेत.


दूरध्वनीसेवा मोफत उपलब्ध

Cinikk नं आपल्या चालू सेवा अधिक प्रभावशाली करण्यासाठी सर्वसामान्यांसाठी विनामूल्य दूरध्वनीसेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामुळे संबंधित व्यक्तींना कोरोनाव्हायरसवरील काही प्रश्नांसाठी पात्र डॉक्टरांशी थेट संवाद साधता येईल. कोरोनाची लक्षणं, घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना आणि तपासणी प्रक्रिया याची माहिती तुम्ही एका फोनद्वारे मिळवू शकता. या विनामूल्य सेवेचा हेल्पलाइन नंबर 8861188846 हा आहे. यावर मिस्ड कॉल देऊन किंवा कंपनीला तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर #askcorona असा हॅशटॅग वापरून प्रश्न विचारू शकता.




हेही वाचा

ICICI बँक आता तुमच्या घरी

कोरोनामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना पाठवले बिनपगारी रजेवर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा